Balasaheb Thackeray Birth Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांचे 'बाळ' नाव कसे ठेवले गेले? जाणून घ्या या मागची कहाणी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दोन शपथा घेतल्या होत्या.एक निवडणूक लढवणार नाही. दुसरी आत्मचरित्र लिहिणार नाही. त्यानुसार त्यांनी आत्मचरित्र लिहिलं नाही. त्यामुळे आपल्याला बाळासाहेबांना आयुष्यभर सावलीसारखे सोबत करणारे भाऊ श्रीकांतजी ठाकरे यांच्या आत्मचरित्रात बाळासाहेबांचं बाळपण शोधावं लागतं.
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झाला आणि मृत्यु 17 नोव्हेंबर 2012 या साली झाला. बाळासाहेब हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक,राजकारणी व व्यंगचित्रकार होते.सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स 1950 मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के.लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे,जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधी व्यक्तिरेखा आवडती होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दोन शपथा घेतल्या होत्या.एक निवडणूक लढवणार नाही. दुसरी आत्मचरित्र लिहिणार नाही. त्यानुसार त्यांनी आत्मचरित्र लिहिलं नाही. त्यामुळे आपल्याला बाळासाहेबांना आयुष्यभर सावलीसारखे सोबत करणारे भाऊ श्रीकांतजी ठाकरे यांच्या आत्मचरित्रात बाळासाहेबांचं बाळपण शोधावं लागतं. (Subhash Chandra Bose Jayanti 2021 Quotes: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 5 विचार बदलतील तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन )
बाळासाहेबांचे नाव बाळ कसे ठेवले गेले याची उस्तुकता सगळ्यांनाच आहे.जगदंबेच्या ओटीत टाकलेला बाळ ही बाळासाहेबांच्या बाळ या नावाशी जोडलेली दैवी कहाणी प्रचलित असली, तरी विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे महत्त्वाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे बाळ या नावाची एक वेगळीच गोष्ट सांगतात.बाळ हे नाव प्रबोधनकारांनी छत्रपती शिवरायांचे जवळचे सहकारी बाळाजी आवजी यांच्यावरून ठेवलं असावं, असा अंदाज ते मांडतात.
बाळाजी आवजी स्वराज्याचे चिटणीस होते. स्वराज्याच्या कारभाराची मुहूर्तमेढ रचण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.बाळासाहेब हिंदुत्ववादी होते. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणाऱ्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये.भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही असे विचार त्यांनी मांडले. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी "हिंदुहृदयसम्राट" म्हटले. 'गर्व से कहो हम हिंदू है' ही घोषणेही ठाकरेंच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)