Bail Pola 2021: बैल पोळा साजरा करा खास; जाणून घ्या विदर्भातील परंपरा
महाराष्ट्र आणि देशभरात हा सण साजरा होतो मात्र प्रदेशपरत्वे परंपरा आणि मान्यतांनुसार, तिथी आणि वेळा वेगवेगळ्या असतात. जसे की, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूर (Baindur) साजरा होतो.
बैल पोळा (Bail Pola), बेंदुर हे सण कृषीप्रधान भारतातील कृषी संस्कृती अधि व्याप्तपणे दर्शवतात. महाराष्ट्र आणि देशभरात हा सण साजरा होतो मात्र प्रदेशपरत्वे परंपरा आणि मान्यतांनुसार, तिथी आणि वेळा वेगवेगळ्या असतात. जसे की, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूर (Baindur) साजरा होतो. तर काही ठिकाणी महाराष्ट्रीय बेंदूर. तसेच, विदर्भामध्ये श्रावणातील शेवटच्या सोमवार ( Shravan Somwar) म्हणजेच पाचव्या सोमवारी (5th Shravan Somwar 2021) बैल पोळा (Bail Pola Traditions in Vidarbha) साजरा होतो. याच दिवशी पिठारी अमावस्या असते. पाठीमागील अनेक वर्षांपासून विदर्भात श्रावणातील शेवटच्या शनिवारी हा सण साजरा केला जातो. जाणून घ्या परंपरेने बैल पोळा ( Bail Pola 2021) सण कसा करतात साजरा?
श्रावण महिन्यातील शेवटच्या म्हणजेच पाचव्या सोमवारी साजरा केला जाणारा बैल पाळा हा प्रामुख्याने मध्य प्रदेश, तेलंगण आणि या राज्यांच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील काही प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर सारा केला जातो. यात प्रामुख्याने विदर्भ आणि सीमेवरील गावांचा समावेश आहे. या दिवशी शेतकऱ्यांचा सोबती आणि प्रमुख मदतगार असेलेल्या बैल आणि पशूधनाची पूजा केली जाते. प्रामुख्याने बैलांची. काळाच्या ओघात बैल गेले आणि ट्रॅक्टर आले. त्यामुळे अनेकांकडे बैल असत नाही. अशा वेळी ज्यांच्याकडे बैल नसतात ते लोक घरी मातीच्या बैलाची पूजा करतात. (हेही वाचा, Bail Pola HD Images 2021: बैल पोळ्यानिमित्त मराठमोठी शुभेच्छापत्र, Messages, Wishes, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून साजरा करा सण)
परंपरेने कसा साजरा करतात बैल पोळा?
बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण दिले जाते. बैलाला स्वच्छ आंघोळ घातली जाते. बैलाचे खांदे हळद, तेल, तूपाने शेखतात. त्याला झूल घातली जाते. सर्वांगावर रंगाचे ठिपके उठवले जातात. कपाळावर बाशींग आणि शिंगांमध्ये शेंब्या घातल्या जाता. गळ्यात कवड्याच्या-घुंगराच्या माळा घातल्या जाता. नाकात नवी वेसण, कासरा घातले जातात. पुरणपोळीचा सुग्रास नैव्येद्य दाखवला जातो.
गावातून मिरवणूक
बैल पोळ्याच्या सणाला शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. प्रत्येकजण आपापल्या स्थितीनुसार बैलाचा साजश्रृंगार करतात. बैलांची गावातून ढोल-ताशे वाजवून मिरवणूक काढतात. तसेच, गावच्या प्रमुख देवळात जाऊन देवाचे दर्शनही बैलांना घडवून आणले जाते. या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरासमोर आंब्यांच्या पानाचे तोरण बांधले जाते. काही प्रदेशांमध्ये बैलपोळ्याची विशेष गाणी म्हणण्याचीही प्रथा आहे. यंदाच्या वर्षी कोरोना संकटामुळे मंदिरे बंद आहेत. त्यामुळे कोरोना निर्बंधांचे पालन करुन हा सण साजरा केला जात आहे.