Baba Amte Jayanti 2020: आधुनिक भारताचे संत अशी ओळख असलेल्या बाबा आमटे यांच्याबद्दल खास गोष्टी!
बाबा आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार या आंतरराष्ट्रीय पुरस्कारापासून भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री आणि पद्मविभूषण देऊन गौरव करण्यात आला आहे.
106th Birth Anniversary Of Baba Amte: समाजातून बेदखल केलेल्या कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटे (Baba Amte) यांच्या रूपाने एक आधारस्तंभ लाखो लोकांसाठी आयुष्याला नवं वळण देऊन गेला. दरम्यान आज चंद्रपूरात आनंदवन मध्ये अनेकांना हक्काचं घर आणि हाताला काम मिळालं आहे. बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 दिवशी झाला. यंदा त्यांची106 वी जयंती आहे. केवळ कुष्ठरोग्यांचे आधारस्तंभ नव्हे तर वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन यासाठी देखील आवाज उठवला आहे. अनेकजण बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत म्हणून त्यांचा उल्लेख करतात. मग जाणून घ्या महान समाजसेवकाबद्दल काही खास गोष्टी! नक्की वाचा: Google Doodle: कुष्ठरोग्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त गुगलची Doodle साकारत मानवंदना.
बाबा आमटे यांच्या बद्दल काही खास गोष्टी!
- बाबा आमटे यांचे मूळ नाव मुरलीधर देवीदास आमटे आहे.
- 1949-50 या कालावधीत त्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्ठरोग निदान आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला.
- बाबा आमटे यांना डॉक्टर होण्याची इच्छा होती पण त्यांनी वडिलांच्या इच्छेखातर वकिलीचे शिक्षण घेतले.
- 1952 साली वरोड्याजवळ बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना केली. 2008 सालापर्यंत 176 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन 3500 कुष्ठरोग्यांसाठी घर बनले आहे.
- बाबा आमटे यांनी सुरू केलेला हा वसा आता त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे कायम ठेवला आहे.
- समाजकार्यामध्ये आपलं जीवन अर्पण केलेल्या बाबा आमटे यांनी ‘ज्वाला आणि फुले’ आणि ‘उज्ज्वल उद्यासाठी’ हे काव्यसंग्रह लिहिले आहेत.
- महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यानंतर बाबा आमटेंनी गांधींजींच्या सत्य, नीति व निर्भयतेवर आधारलेल्या विचारसरणीने प्रभावित होऊन दीनदलितांच्या सेवेसाठी काम केले.
- नर्मदा बचाव आंदोलनातही बाबांचा सक्रीय सहभाग होता.
- धडाडी, जिद्द तरीही संवेदनशील व्यक्तिमत्त्वाच्या बाबा आमटे यांनी आपलं जीवन कुष्ठरोग्यांसाठी अर्पण केले. 2008 साली रक्ताच्या कर्करोगाच्या विळख्यात अडकलेल्या बाबा आमटे यांचं निधन झालं.
बाबा आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार या आंतरराष्ट्रीय पुरस्कारापासून भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री आणि पद्मविभूषण देऊन गौरव करण्यात आला आहे. 2018 साली गूगल डूडलच्या माध्यमातूनही त्यांना गौअरवण्यात आले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)