APJ Abdul Kalam Quotes: डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करा 'मिसाईल मॅन' चे हे प्रेरणादायी विचार
त्यांच्या भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे केलेल्या कामाची मोठी ठेव आहे.
भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळख असलेल्या 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम' (APJ Abdul Kalam) यांचा जन्म दिवस 15 ऑक्टोबर दिवशी असतो. हा दिवस वर्ल्ड स्टूडेंट्स डे (World Student's Day)म्हणून देखील साजरा केला जातो. 2010 पासून संयुक्त राष्ट्राने (United Nations) डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या 79 व्या जन्मदिवस जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. कलाम हे विद्यार्थ्यांसाठी जसे व्यक्तिमत्त्व म्हणून आदर्श होते तसेच त्यांचे लेखन देखील प्रेरणादायी आहे. मग आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत त्यांचेच काही प्रेरणादायी विचार शेअर करून तुम्ही त्यांच्याप्रति आदरांजली अर्पण करू शकाल.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे 11 वे राष्ट्रपती होते. भारताच्या अंतराळ विश्वात त्यांचे कार्य मोलाचे आहे. डॉ. कलाम यांच्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत चैतन्य, नव काही शिकण्याची आणि शिकवण्याची उर्जा कायम होती. त्यांचं प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आजही अनेकांना नैराश्यातून, अपयशातून, अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी दिशादर्शक आहेत.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे निधान शिलॉंगमध्ये 2015 साली झाली. आयआयएम शिलॉंगमध्ये भाषण देताना मंचावरच डॉ. कलाम यांना हृद्यविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.