Annabhau Sathe Birth Anniversary 2022: अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचे काही समाज प्रबोधन करणारे विचार
त्यांच्या फकिरा या कादंबरीस राज्य सरकारचा 1961 सालचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कारही प्राप्त झाला.
समाजसुधारक, लोककवी, लेखक, शाहीर अशी अनेक बिरुदे मिरवणारे अण्णा भाऊ साठे म्हणजेच तुकाराम भाऊराव साठे यांची आज जयंती (Annabhau Sathe Birth Anniversary 2022). सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात 1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला होता. सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहिरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाजप्रबोधन केले. जातीव्यवस्था आणि गरीबीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही, मात्र अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात मात्र खूप मोठी झेप घेतली. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान लाभले होते. पुरोगामी विचारांचा अखंड महाराष्ट्र घडवून जगात महाराष्ट्राचे नाव कोरले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. दलितांच्या गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवला होता. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक यांच्या वेदना जाणून घेऊन त्यांवर केलेले लेखन ही अण्णाभाऊ यांची विशेषता. म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे.
अशा या अण्णाभाऊंच्या जयंतीनिमीत्त जाणून घ्या त्यांचे काही प्रेरणादायी विचार-
दरम्यान, अण्णाभाऊ यांनी त्यांच्या साहित्यिक जीवणात आत्तापर्यत 20 पेक्षा अधिक ग्रंथ अणि 25 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या फकिरा या कादंबरीस राज्य सरकारचा 1961 सालचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कारही प्राप्त झाला. त्यांचे साहित्य चौदा भारतीय भाषा आणि इंग्रजी, जर्मन, रशियन अशा अनेक परदेशी भाषेतही प्रसिद्ध आहे.