Ambedkar Jayanti 2020: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या या पुस्तकांचे वाचन करून साजरी करा यंदाची लॉकडाऊन मधील आंबेडकर जयंती!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मराठीसोबतच हिंदी, इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, पाली, जर्मन सारख्या 9 भाषांचं ज्ञान होतं. त्याच्या 'राजगृहात' सुमारे 50,000 पुस्तकं होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Photo Credits: Wikimedia Commons)

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशी शिकवण देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थी दशेपासुन तेजस्वी होते. मध्यप्रदेशातील महु गावात जन्म झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाचा प्रवास सातारा पासून सुरू झाला. पुढे मुंबई आणि थेट लंडनला जाऊन त्यांनी कायद्याचे उच्च शिक्षण घेतले. भारतामध्ये परतल्यानंतर गोर गरिबांसाठी, अस्पृश्यांसाठी लढा उभा केला. अशावेळेसही त्यांनी लोकांना शिकण्याचा, ज्ञान संपादित करण्याचा सल्ला दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मराठीसोबतच हिंदी, इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, पाली, जर्मन सारख्या 9 भाषांचं ज्ञान होतं. त्याच्या 'राजगृहात' सुमारे 50,000 पुस्तकं होती. समाजातील चूकीच्या गोष्टींवर मार्मिक लिखाणातून प्रबोधन करण्यासाठी त्यांनी स्वतः काही पुस्तकांचे लेखन केले होते.Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2020 Songs: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महामानवाला अभिवादन करणारी खास भीमगीतं! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस ज्ञान दिवस म्हणून देखील साजरा केला जात असल्याने आज त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून त्यांनी लिहलेल्या काही पुस्तकांची माहिती करून घ्या आणि आजपासून त्यापैकी तुम्हांला कोणकोणती पुस्तकं वाचता येत आहेत हे पहा. Happy Ambedkar Jayanti 2020 Wishes: भीम जयंतीच्या शुभेच्छा मराठी Messages, WhatsApp Stickers च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली पुस्तकं

कास्ट्स इन इंडिया (१९१७)

स्मॉल होल्डिंग इन इंडिया ॲंड देअर रेमीडिज (१९१८)

द प्रॉब्लम ऑफ द रूपी (१९२३)

दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया (१९२४)

वेटिंग फॉर अ व्हिझा (१९३५-३६)

अनाइअलेइशन ऑफ कास्ट (१९३६)

मिस्टर गांधी ॲंड दी एमॅन्सीपेशन ऑफ दी अनटचेबल्स (१९४५)

रानडे, गांधी ॲंड जिन्ना (१९४३)

थॉट्स ऑन पाकिस्तान (१९४५)

व्हॉट कॉंग्रेस ॲंड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स (१९४५)

महाराष्ट्र एज ए लिंग्विस्टिक स्टेट (१९४५)

हू वर दि शुद्राज? (१९४६)

स्टेट्स ॲंड माइनॉरिटीज (१९४७)

हिस्ट्री ऑफ इंडियन करंसी ॲंड बॅंकिंग (१९४७)

द अनटचेबल्स: हू वर दे ॲंड व्हाय दी बिकम अनटचेबल्स (१९४८)

थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट (१९५५)

बुद्ध ॲंड कार्ल मार्क्स (१९४६)

कम्यूनल डेडलाक ॲंड वे टू सॉल्व इट (१९४५)

बुद्ध ॲंड दी फ्युचर ऑफ हिज रिलीजन (१९५०)

फ्युचर ऑफ पार्लियामेन्ट्री डेमोक्रेसी (१९५१)

लिंग्विस्टिक स्टेट्स नीड्स फार चेक्स ॲंड बॅलेन्सेज (१९५३)

बुद्धिज्म ॲंड कम्यूनिज्म (१९५६)

द बुद्धा ॲंड हिज धम्मा (१९५७)

हिंदू वुमन: राइजिंग ॲंड फॉल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस हा ज्ञान दिवस आणि समता दिन म्हणून देखील महाराष्ट्रात साजरा केला जातो. यंदा आंबेडकर जयंतीचं सेलिब्रेशन बाहेर पडून सामुहिकरित्या एकत्र जमून करण्यास बंदी आहे. त्यामुळे यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे किमान 30 एप्रिल पर्यंत कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये घरीच अडकून पडल्याने या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी डॉ. भीमराव आंबेडकरांनी लिहलेली ही समाहव्यवस्थेवरील काही पुस्तकं ऑनलाईन वाचून तुमचा वेळ नक्कीच सत्कारणी लावू शकता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now