Amalaki Ekadashi 2020: ​आमलकी एकादशी च्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा का केली जाते? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

संपूर्ण वर्षभरात 14 एकादशी येतात. यातील एक महत्त्वपूर्ण एकादशी म्हणजेच आमलकी एकादशी होय. येत्या शुक्रवार म्हणजे 6 मार्च रोजी 'आमलकी एकादशी' साजरी केली जाणार आहे. या एकादशीला 'रंगभरनी एकादशी' असेही म्हणतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. पौराणीक कथेनुसार, जे लोक आमलकी एकादशीचे व्रत करू शकत नाहीत, त्यांनी या दिवशी आवळ्याचे सेवन केले पाहिजे. तसेच या एकादशीला विष्णू देवाचे पूजन केल्याने लाभ होतो.

Lord Vishnu (Photo Credit - Facebook)

Amalaki Ekadashi 2020: पुराणांमध्ये एकादशीच्या व्रताला मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षभरात 14 एकादशी येतात. यातील एक महत्त्वपूर्ण एकादशी म्हणजेच आमलकी एकादशी होय. येत्या शुक्रवार म्हणजे 6 मार्च रोजी 'आमलकी एकादशी' (Amalaki Ekadashi) साजरी केली जाणार आहे. या एकादशीला 'रंगभरनी एकादशी' असेही म्हणतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. पौराणीक कथेनुसार, जे लोक आमलकी एकादशीचे व्रत करू शकत नाहीत, त्यांनी या दिवशी आवळ्याचे सेवन केले पाहिजे. तसेच या एकादशीला विष्णू देवाचे पूजन केल्याने लाभ होतो.

आमलकी एकादशीच्या दिवशी सकाळी उठून संकल्प करावा. या दिवशी दिवसातून एकदाच फलाहार घ्यावा. त्यानंतर चौरंगावर किंवा पाटावर श्रीविष्णूच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची स्थापन करून पूजा करावी. व्रत करणाऱ्या व्यक्तीने विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करावेत. या व्रताचे समापन एकादशीला होत नाही. त्यामुळे द्वादशीला सकाळी ब्राह्मणाला अन्नदान आणि दक्षिणा करून या व्रताची समाप्ती करावी. (हेही वाचा - Shimga Festival 2020: शिमगोत्सव निमित्त कोकणात दशावतार, जाखाडी नृत्य ते ग्रामदैवतेची पालखी नाचवणं असा असतो होळी सणाचा उत्साह!

आवळ्याच्या झाडाची पूजा करा -

आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाचे विशिष्ट्य महत्त्व असते. पौराणिक कथांनुसार, आवळ्याच्या झाडाला भगवान विष्णु यांनी जन्म दिला होता. त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या झाडाच्या खोडाजवळ स्वच्छता करा. तसेच खोडाजवळ शेणाने सारवून घ्या. त्यानंतर तेथे कलशाची स्थापना करा. भगवान विष्णूची मनोभावे पूजा करा. कलशाजवळ तुपातला दिवा लावा आणि विष्णूची आरती करून नैवैद्य दाखवा. या दिवशी आवळा सेवन केल्याने लाभ होतो.