Ahilyabai Holkar Jayanti 2023 Images: अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त Facebook Messages, WhatsApp Status द्वारा अर्पण करा आदरांजली !

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त शेअर करा त्यांना आदरांजली अर्पण करणारे व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस, फेसबूक मेसेजेस, स्टेटस

Ahilyabai Holkar | File Image

महाराष्ट्राला कुशल महिला प्रशासकांचादेखील वारसा आहे. अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) या त्यांच्यापैकी एक आहे. अहिल्याबाईंचा जन्म महाराष्ट्रातील जामखेड मधील आहे. त्यांचं वास्तव्य आता मध्य प्रदेशात असलेल्या इंदौर मध्ये होते. वयाच्या 8व्या वर्षी होळकरांची सून ते 'तत्त्वज्ञानी राणी' असा अहिल्याबाईंचा प्रवास प्रेरणादायी आहे. आज अहिल्याबाईंच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांना अभिवदान करण्यासाठी सोशल मीडीयामध्ये तुम्ही Facebook Messages, WhatsApp Status, Wishes, HD Images द्वारा लेटेस्टली टीम कडून तयार करण्यात आलेली ग्रीटिंग्स नक्की शेअर करू शकता.

अहिल्याबाई होळकर या माळवा प्रांताच्या जहागीरदार होत्या. पतीच्या पश्चात त्यांना सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना सती जाऊ न देता सैन्य, राज्यकारभार यांचं शिक्षण दिलं. मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर माळवा प्रांताचा कारभार त्या स्वत: सांभाळू लागल्या. वयाच्या 8व्या वर्षी होळकरांची सून ते 'तत्त्वज्ञानी राणी' पहा अहिल्याबाईंचा हा प्रेरणादायी प्रवास कसा होता?

अहिल्याबाई होळकर जयंती

Ahilyabai Holkar | File Image
Ahilyabai Holkar | File Image
Ahilyabai Holkar | File Image
Ahilyabai Holkar | File Image
Ahilyabai Holkar | File Image

अहिल्याबाई होळकर यांनी समाजातील रूढीवादी नियमांविरुद्ध लढा दिला आणि एक कणखर व स्वावलंबी महिला शासक म्हणून आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी अनेक संघर्षांचा सामना केला. भारतामध्ये अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधण्यात, मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.