80th Independence Day Messages in Marathi: स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Images, Quotes शेअर करत साजरा करा राष्ट्रीय सण

भारतामध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. . हा दिवस केवळ सुट्टी नाही, तर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या त्यागाची आणि शौर्याची आठवण करून देतो.

80th Independence Day Messages in Marathi: स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा  WhatsApp Status, Images, Quotes शेअर करत साजरा करा राष्ट्रीय सण

Happy Independence Day 2026: 15 ऑगस्ट हा भारतीयांसाठी राष्ट्रीय सण आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला मिळालेलं स्वातंत्र्य या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने जबाबदारीचं भान आणून देणारे आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणजे तो आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून हा दिवस देशभक्तीच्या उत्साहात साजरा केला जातो. मग या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या मेसेजेस, संदेश,WhatsApp, Instagram Status, HD Images, Quotes द्वारा शेअर करत त्याचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.

भारताचा स्वातंत्र्यदिन दिल्लीपासून गल्लीपर्यंत साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित करतात. तर देशभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने देशसेवेचा वसा आणि शूरवीरांनी देशासाठी पत्करलेले हौतात्म्य विविध माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहचवलं जातं.नक्की वाचा: 15th August Working Day Funny Memes: 15 ऑगस्ट वर्किंग डे? कॉर्पोरेट मीम्सनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ.   

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

Marathi Independence Day 2026 wishes celebrating India’s freedom and national pride.
Happy Independence Day 2026

सूर्य उगवला मुक्त गगनी, साखळ्या तुटल्या अंधाराच्या,

बलिदानाच्या ज्वाळेतुनी उजळल्या वाटा उद्याच्या.

स्मरण करूया त्या वीरांचे, ऋण फेडूया मायभूमीच्या!

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

Independence Day 2026 Marathi wishes featuring the Indian tricolour and patriotic message.
Happy Independence Day 2026

विविधतेत एकतेचा सूर, हीच आपली खरी शान,

तिरंग्याखाली उभे सारे, एकच स्वप्न, एकच गान.

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छांसह वाढवूया देशाची मान!

80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

15 August 2026 Independence Day wishes in Marathi for friends and family.
Happy Independence Day 2026

हिमालयाची उंची, सागराची खोली, हाच माझा भारत महान,

विविधतेत एकता जपत, वाढवूया देशाची शान.

80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Patriotic Happy Independence Day 2026 greeting with Marathi wishes and Indian flag.
Happy Independence Day 2026

गुलामीच्या अंधारातुनी उजळली स्वातंत्र्याची वाट,

हौतात्म्याच्या पायावरी उभी आहे आजची भरारी थाट

80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Independence Day 2026 wishes in Marathi with a patriotic Indian flag-themed design.
Happy Independence Day 2026

रक्तांजली वाहिली ज्यांनी मायभूमीच्या चरणी,

त्यांच्याच त्यागातुनी उगवली स्वातंत्र्याची पहाट सोनेरी.

वंदन करूया त्या वीरांना, कृतज्ञ राहू सदैव अंतःकरणी

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भारतामध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. . हा दिवस केवळ सुट्टी नाही, तर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या त्यागाची आणि शौर्याची आठवण करून देतो. या दिवशी आपण आपल्या देशासाठी लढलेल्या वीरांना आदरांजली वाहतो आणि आपल्या लोकशाही मूल्यांचे पुनरुच्चार करतो.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).