79 वर्षांच्या आजीबाई बनल्या Lingerie Model; भल्या भल्या तरुणींना देत आहेत आव्हान (Photo)
मात्र आता एक अंतर्वस्त्र मॉडेल (Lingerie Model) म्हणून त्या लोकप्रिय ठरत आहेत.
आजच्या काळात कोणीही स्वतःच्या वयाला आपला कमकुवतपणा मानत नाही. त्यामुळे वयाच्या कोणत्याही वर्षी आपल्याला जे करायचे ते करण्याचा प्रयत्न केला जातो. एका महिलेला असेच वाटते जिच्याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बालपण, तारुण्य, म्हातारपण हे माणसाच्या आयुष्यातील तीन टप्पे आहेत. जीवनाच्या या तीनही टप्प्यांवर चढ-उतार आहेत आणि यातूनच लोक आपल्या स्वप्नाचा ध्यास घेतात. अशाच एक Helena Schargel नावाच्या आजीबाई आहेत, ज्यांचे वय आहे 79 वर्षे. मात्र आता एक अंतर्वस्त्र मॉडेल (Lingerie Model) म्हणून त्या लोकप्रिय ठरत आहेत.
Helena Schargel या ब्राझीलच्या रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्या पूर्वी काम करायच्या. किशोरवयातच कपडे बनवायला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी बनवलेले कपडे त्यांच्या आई-वडिलांच्या दुकानात विकले जायचे. मात्र वय वाढल्याने फक्त घरी बसून राहणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे कपडे तयार करण्याचे काम कमी केल्यावर अंतर्वस्त्र मॉडेल होण्याचा निर्णय घेतला. आता आपल्या या नवीन छंदाद्वारे त्या इतर अनेक महिलांसाठी रोल मॉडेल ठरत आहेत. हेलेना यांचे दोन विवाह आहेत आणि त्यांना दोन मुले तसेच पाच नातवंडे आहेत. (हेही वाचा: Arianny Celeste: जगातील सर्वात सुंदर, तितकीच महागडी रिंग गर्ल एरियनी सेलेस्टे हिचे कॅलेंडर 2020 साठी हॉट फोटोशूट)
View this post on Instagram
Nessa semana na #vejasp #helenaschargel #reccolingerie #palestrasmotivacionais #60+
A post shared by Helena Schargel (@helenaschargel) on
हेलेना त्यांच्या संपूर्ण जीवनात त्या कधीच जिममध्ये गेल्या नाहीत. त्यांच्या फिट राहण्याचे रहस्य हे त्यांचा डाएट हे आहे. हेलेना यांचे इंस्टाग्रामवरील अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. अनेक स्त्रिया त्यांची छायाचित्रे पाहिल्यानंतर प्रेरित झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. ब्राझिलियन रेस्को लाँचरच्या सहकार्याने हेलेनाने महिलांसाठी अनेक अंतर्वस्त्रांचे कलेक्शन लाँच केले, जे सध्या लोकप्रिय ठरत आहे.