Cannes 2019 Red Carpet: ऐश्वर्या राय बच्चन मेटॅलिक गाऊनमध्ये अवतरली यंदा 'कान्स'च्या रेड कार्पेटवर; मेकअपने वेधलं लक्ष

मेटॅलिक गाऊन प्रमाणे तिच्या मेकअपच्याही यंदा चर्चा झाल्या.

Aishwarya Rai Bachchan (Photo Credits: Instagram)

प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत यांचा यंदाचा कान्स फिल्म फेस्टिवल्समधील रेड कार्पेटवरील अदा पाहिल्यानंतर अनेकांना यंदा ऐश्वर्या राय बच्चन कोणत्या अंदाजात हजेरी लावतेय? याबाबत उत्सुकता होती. यंदा 72 व्या कान्स फेस्टिवल्समध्ये ऐश्वर्या Jean-Louis Sabaji च्या मेटॅलिक गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरली. पिवळ्या रंगाच्या वन शोल्डर ऑफ गोल्डन मैटेलिक फिश-कट गाउनमध्ये यंदा ऐश्वर्या पहायला मिळाली. प्रियंका चोपड़ा, कंगना रनौत, दीपिका पादुकोण ची कान्स फिल्म फेस्टिवल्सच्या रेड कार्पेटवर हजेरी (Photos)

ऐश्वर्याच्या लूक्सच्या चर्चा

ऐश्वर्या यंदा सलग 18 व्या वेळेस कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली. मेटॅलिक गाऊन प्रमाणे तिच्या मेकअपच्याही यंदा चर्चा झाल्या. कानामध्ये इअरिंगच्या ऐवजी मेटलिक हायलाईट्सचा मेकअप आणि स्ट्ड्स होते.

ऐश्वर्या राय बच्चन सोबत यंदाही तिच्या लेकीची झलक पहायला मिळाली. आराध्याने ऐश्वर्यासोबत ट्विनिंग करत पिवळ्या रंगाचा फ्रॉक घातला होता.