Allegations On Governor CV Ananda Bose: पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही बोस यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप, राजकारणात खळबळ
व्ही. आनंदा घोष यांच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजभवानातील एका महिला कर्मचाऱ्याने हा आरोप केला आहे.
Governor CV Ananda Bose: पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंदा घोष (C V Anada bose) यांच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजभवानातील एका महिला कर्मचाऱ्याने हा आरोप केला आहे. पीडित महिलेने कोलकत्ता येथील हेअर स्ट्रीट पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवली आहे. लोकसभाच्या निवडणूच्या (Loksabha Election) पार्श्वभुमीवर ही घटना घडल्याने राजकराणात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा)
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्रीच्या मुक्कामासाठी राजभवनात येणार होते. त्या आधीच ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये तीन निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत. पीडित महिलेने हा तक्रार केल्यानंतर राजपालांनी हा आरोप फेटाळून काढला आहे.
या आरोपावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, मला बदनाम करण्यासाठी हा षडयंत्र रचला आहे. माझ्यावर जे आरोप केले आहे ते खोटे आहे. सत्याचा विजत होईल, या घटनेला घाबरत नाही. माझी बदनामी करून कोणाला निवडणूकीसाठी फायदा घ्यायाच असेल, तर देव त्यांचं भल करो, अशी प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडली आहे. परंतु ते बंगालमधील भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या विरोधात माझा लढा थांबवू शकत नाहीत असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या घटनेची माहिती राजकारणात पसरताच, सागरिका घोष यांनी या घटनेची माहिती सोशल मीडियावर दिली. ट्वीटरवर सागरिका घोष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लैगिंक छळाप्रकरणी राज्यपालांना जाब विचारणार का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, कलम ३६१ नुसार, राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यावर कोणताही फौजदारी कारवाई सुरु केली जाऊ शकत नाही.