Vistara Airlines Manager Commits Suicide: विस्तारा एअरलाइन्सच्या व्यवस्थापकाची नोएडामध्ये आत्महत्या, कारमध्ये सापडला मृतदेह
मृत 32 वर्षीय निशांत हा ग्रेटर नोएडा पश्चिम येथील रेसिडेन्सी हाउसिंग सोसायटीमध्ये राहत होता. निशांतची गुरुग्राममधील विस्तारा एअरलाइन्सच्या कार्यालयात व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
Vistara Airlines Manager Commits Suicide: नोएडामधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. नोएडामधील हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या विस्तारा एअरलाइन्स (Vistara Airlines) च्या व्यवस्थापकाने आत्महत्या (Suicide) केली. मॅनेजरचा मृतदेह त्यांच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये आढळून आला. प्राथमिक तपासात त्यांनी विष प्राशन केल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मृत 32 वर्षीय निशांत हा ग्रेटर नोएडा पश्चिम येथील रेसिडेन्सी हाउसिंग सोसायटीमध्ये राहत होता. निशांतची गुरुग्राममधील विस्तारा एअरलाइन्सच्या कार्यालयात व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तो दररोज सकाळी 8 वाजता ग्रेटर नोएडा पश्चिम येथून गुरुग्राम येथील कार्यालयासाठी निघत असे. मात्र, शुक्रवारी सकाळी त्यांची कार सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी असलेली दिसली. गार्डने तपासले असता निशांत गाडीत पडलेला होता. (हेही वाचा -Haryana Shocker: धक्कादायक! आधी पत्नीचे हात कापले, नंतर डोकं चिरलं आणि मृतदेह पेटवून दिला; आरोपी पतीला अटक)
या प्रकरणाची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. व्यवस्थापकाने आत्महत्या का केली? हे सध्या कळू शकलेले नाही. मात्र प्राथमिक तपासात विष खाल्ल्याची बाब समोर येत आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2023 05:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

