Viral Video: तरुणीचा भरधाव कारसोबत जीवघेणा स्टंड, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

त्यापैकी काही माहितीच्या आधारे असतात तर काही तरुण जीवघेणा स्टंट करून दाखवतात.

Viral Video PC TWITTER

Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.  त्यापैकी काही माहितीच्या आधारे असतात तर काही तरुण जीवघेणा स्टंट करून दाखवतात. दरम्यान एक व्हिडिओ सद्या चर्चेत आहेत. व्हिडिओत महिला कार सोबत स्टंट करताता दिसत आहे. कार रस्त्यावर वेगवान धाव घेत आहे आणि एकीकडे तरुणीचा विचित्र स्टंट. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा-  देसी जुगाड! गरम प्रेशर कुकरने महिलेने केले कपडे इस्त्री, व्हिडीओ व्हायरल)

व्हिडिओ दिसल्याप्रमाणे, तरुणी भरधाव कारच्या दरवाजाला पकडून थांबलेली असून कारचालकानेही तिली एका हाताने पकडलेले दिसत आहे आणि मागून येणाऱ्या एका कार चालकाने हा व्हिडिओ कॅमेरात कैद केला आहे. धक्कादायक म्हणजे या कारच्या पाठी मागे वकिलांची ओळख पटवून देणारे स्टीकर लावण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यावर एकाने म्हटले की, तरुणीवर आणि कार चालकावर पोलिसांनी कारवाई लवकर करावी.

कारसोबत स्टंट करणारी तरुणी कोण आहे. हा व्हिडिओ कोणत्या उद्देशाने काढला आहे हे अद्याप समोर आले नाही. हा व्हिडिओ लखनऊ मधील असल्याचे समोर आले आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओची पोलिसांनी दखल घेतली आहे. पोलिसांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली आणि माहिती दिली आहे. यावर आवश्यक कार्यवाही करून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.