देशातील 'लव्ह जिहाद' च्या मुद्द्यानंतर उत्तराखंड सरकारची नवी योजना; आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना मिळणार 50 हजार रुपये
तर उत्तराखंडमधील भाजपा सरकार इतर धर्म आणि जातींमध्ये विवाह करणार्या जोडप्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देत आहे.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणा सारख्या भाजपा शासित राज्ये लव्ह जिहादविरोधात कठोर कायदे करण्यात व्यस्त आहेत. तर उत्तराखंडमधील भाजपा सरकार इतर धर्म आणि जातींमध्ये विवाह करणार्या जोडप्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देत आहे. एका वृत्तानुसार, ज्या विवाहित जोडप्यांनी आपल्या विवाहाची नोंद केली आहे. अशा सर्व जोडप्यांना उत्तराखंड सरकार ही रक्कम प्रोत्साहन म्हणून देत आहे. यासंदर्भात राज्य समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.
आंतरजातीय विवाह केल्यानंतर 50 हजार प्रोत्साहनपर रक्कम मिळण्यासाठी सरकारकडून एक अट ठेवण्यात आली आहे. याअंतर्गत, जोडीदारांपैकी एकजण अनुच्छेद 341 मध्ये नमूद केलेल्या अनुसूचित जातीमधील असावा. (हेही वाचा -COVAXIN III Phase Test: कोवॅक्सिन लसीची तिसऱ्या टप्प्यात चाचणी यशस्वी झाल्यास 1 हजारपैकी 50 टक्के जणांना दिली जाणार)
टेहरीचे समाज कल्याण अधिकारी दिपंकर घिडियाल म्हणाले की, इतर जातींना देण्यात येणारी रक्कम आणि इतर धर्मांमध्ये लग्न करणार्यांना राष्ट्रीय एकता वाढविण्यात महत्त्वपूर्ण ठरू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लग्नाच्या एका वर्षाच्या आत जोडप्यांना अर्ज करावा लागेल.
यापूर्वी या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह आणि इतर धर्मात विवाह करणाऱ्या जोडप्यांना 10 हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्यात येत होती. परंतु, 2014 मध्ये राज्य सरकारने उत्तर प्रदेश आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह प्रोत्साहन नियमावली 1976 मध्ये दुरुस्ती करून ही रक्कम 50 हजार रुपये केली. सन 2000 मध्ये स्वतंत्र उत्तराखंडची स्थापना झाली तेव्हा उत्तराखंड राज्याने हा कायदा उत्तर प्रदेशमधून घेतला होता.