अयोध्येत दारु आणि मांसाहार बंदी? संत मंडळींची मागणी
भगवान राम नगरी म्हणून ओळख असणाऱ्या अयोध्येत आता दारु आणि मांसाहार बंदीसाठी शासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत.
उत्तर प्रदेशात दबदबा असणाऱ्या योगी सरकारने फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून 'अयोध्या' ठेवले आहे. भगवान राम नगरी म्हणून ओळख असणाऱ्या अयोध्येत आता दारु आणि मांसाहार बंदीसाठी शासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत.
योगी सरकारने दारु आणि मांसाहार बंदीचा निर्णय हा तेथील संतांनी केलेल्या मागणीमुळे अमलात आणला जात आहे. तसेच अयोध्या हे नाव ठेवल्याने या गोष्टींवर लवकरात लवकर बंदी घालावी असे संत मंडळींचे म्हणणे आहे. तर दारु आणि मांसाहार करणे म्हणजे हिंसा आणि प्रदुषणाला आमंत्रण देत असून रामनगरीत या गोष्टी वगळल्या जाव्यात असे संत मंडळी सांगत आहेत.
तर अयोध्येमधील विश्व हिंदू परिषदेच्या प्रवक्ताने दारु आणि मांसाहर बंदी ही उत्तम योजना असून त्याचे स्वागतच आहे असे सांगितले. त्याचबरोबर या वस्तूंच्या विक्रीमुळे संत मंडळी त्रस्त झाली आहेत.