UP Shocker: 18 विद्यार्थिंनींचा लैगिंक छळ केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल, सरकारी शाळेतील धक्कदायक प्रकार
सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकावर विद्यार्थिंनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
UP Shocker: उत्तर प्रदेशातील उन्नाव (Unnao) जिल्ह्यात सरकारी शाळेतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकावर विद्यार्थिंनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाल आयोगाच्या सदस्य प्रीती भारद्वाज दलाल यांनी शनिवारी मुलींची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. 18 विद्यार्थींचा लैंगिक छळ केल्याची माहिती मिळाली. शिक्षक राजेश कुमार असं आरोपी शिक्षकांचे नाव आहे.
या प्रकरणी एका मुलीने नॅशनल कमिशन फॉर प्रोटेश्कन ऑफ चाइल्ड राइट्सकडे संपर्क साधल्यानंतर आणि भारताच्या पंतप्रधानांच्या वेबसाइटवर तक्रार लिहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. “शाळेच्या कुकच्या तक्रारीच्या आधारे, राजेश कुमार यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर नोंदवण्यात आला. फरार असलेल्या कुमारचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षकावर योग्य ती कारवाई करावी अशी पालकांनी विनंती केली आहे. उन्नव परिसरातील सरोसी ब्लॉक कंपोजिट शाळेतील धक्कादायक घटना आहे. उन्नाव पोलिस ठाण्यात या घटनेचा तक्रार नोंदवला गेला आहे.