Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील धवरी धरणात दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

ही घटना १५ सप्टेंबर २०२४ रोजी घडली. दोन्ही तरुण धरणात अंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यावेळीस ही घटना घडली. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

Drowning (PC - Pixabay)

 Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील पन्ना येथील धवरी धरणात दोन एमबीबीएस विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना 15 सप्टेंबर 2024 रोजी घडली. दोन्ही तरुण धरणात अंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यावेळीस ही घटना घडली. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा-हरियाणा येथे मुसळधार पावसाच्या पाण्यात कार बुडाली, बॅंकेतील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील अजयगड शहराजवळील धवरी धरणावर ही घटना घडली. रविवारी दुपारी दोघे जण घरातून बाहेर पडले होते. परंतु ते घरी परतले नाही त्यामुळे त्यांची शोधाशोध घेण्यात आली. उमरिया येथील अरविंद प्रजापती १९ आणि अजयगड येथील रहिवासी कृष्णा गुप्ता २० अशी मृतांची नावे आहे.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, धवरी धरणावर दाखल झाले. मदत आणि बचाव कार्य सुरु झाले. दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दोन्ही मृत विद्यार्थ्यांनी इंदूरच्या महात्मा गांधी मेमोरियल (एमजीएम) वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता, जिथे ते एमबीबीएस प्रोग्रामद्वारे उच्च शिक्षण घेत होते.

पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने दोघांचा बूडून मृत्यू झाला असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी दोन्ही तरुणांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif