Greater Noida Teacher Beating 3 Children: शिक्षिकेची तीन विद्यार्थ्याला काठीने बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी संतापले

या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला.

Teacher Brutally Beating UP (Photo Credit Twitter)

Greater Noida Teacher Beating 3 Children: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एक महिला शिक्षिका विद्यार्थ्यांना काठीने बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणी पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली पाहिजे असं नेटकऱ्यांनी सांगितले आहे. ही घटना मंगळवारी २० ऑगस्ट डेरिने गुजरन गावात घडली. मुलांना ती कोणत्या कारणावरून मारत आहे हे अद्याप समजू शकले नाही. (हेही वाचा- 'शाळाच सुरक्षित नसतील, तर शिक्षणाच्या अधिकारावर बोलण्यात काय फायदा?’; बदलापूर आदर्श शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत Bombay High Court ची टिपण्णी)

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरन गावातील एका खासगी शाळेत एक महिला शिक्षिका अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करत आहे. तर एकाने लांबून ही घटना फोनमध्ये कैद केली. शिक्षक तीन मुलांना काठीने मारहाण करत आहेत आणि त्यांना सतत चापट मारत आहेत, तर मुले रडत आहेत, शिक्षकाच्या भीतीमुळे हालचाल करू शकत नाहीत.

शिक्षिकेची तीन विद्यार्थ्याला मारहाण (पाहा व्हिडिओ)

ही घटना एकाने रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर शेअर केली. ही घटना रॅकोर्ड करणाऱ्या व्यक्तीने असाही दावा केला आहे की, शिक्षक नियमितपणे अशाच पध्दतीने मुलांना मारहाण करतात. मुलांना रोज अमानुष मारहाण करतात. तरी पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करू नयेत. पोलिसांनी या प्रकरणी सांगितले की, आरोपी शिक्षकांवर कारवाई करून मात्र, या व्हिडिओची तपासणी केली जात आहे. दोषी आढळल्यास शिक्षकावर कडक कारवाई केली जाईल, असा दावा त्यांनी केला.