Mata Vaishno Devi Yatra: वैष्णो देवी मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले; मात्र, भाविकांना करावं लागणार 'या' अटीचं पालन

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली वैष्णवदेवी यात्रा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जम्मू- काश्मीर प्रशासनाने 16 ऑगस्टपासून वैष्णोदेवी यात्रा सुरू करण्यास परवानगी दिली असून पहिल्या आठवड्यात दररोज 2 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. यात 1 हजार 900 भारतीय आणि 100 परदेशी भाविकांना दर्शनासाठी सोडलं जाणार आहे.

Vaishno Devi Temple (PC - Wikimedia Commons)

Mata Vaishno Devi Yatra: यंदा सर्वचं सण उत्सवावर कोरोनाचं संकट आहे. कोरोना विषाणूच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली वैष्णवदेवी यात्रा (Vaishno Devi Yatra) आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जम्मू- काश्मीर प्रशासनाने 16 ऑगस्टपासून वैष्णोदेवी यात्रा सुरू करण्यास परवानगी दिली असून पहिल्या आठवड्यात दररोज 2 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. यात 1 हजार 900 भारतीय आणि 100 परदेशी भाविकांना दर्शनासाठी सोडलं जाणार आहे.

दरम्यान, यात्रेसाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने अनेक नियम तयार केले आहेत. यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क परिधान करावे लागणार आहे. याशिवाय भाविकांचे थर्मल स्क्रिनिंगही करण्यात येणार असून या सर्वांना मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं अनिवार्य असणार आहे. (हेही वाचा - Coronavirus Update: देशात 63,489 नव्या रुग्णांंसह आज कोरोनाबाधितांचा एकुण आकडा 25,89,682 वर; मृत्यु दर 2 टक्क्यांवर पोहचला)

विशेष म्हणजे या यात्रेत 60 वर्षांवरील व्यक्ती, गर्भवती महिला आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर भाविकांना यात्रेची परवानगी देण्यात येईल. याव्यतिरिक्त भाविकांना देवीकडे काहीही अर्पण करता येणार नाही. तसेच देवीदेवतांच्या मूर्तींनादेखील हात लावता येणार नाही.