Uttar Pradesh Shocker: लोहिया विद्यापीठात IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; वसतिगृहात सापडला मृतदेह
शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजेल. अद्याप कॉलेज प्रशासन किंवा पोलिसांकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
Uttar Pradesh Shocker: लखनऊ (Lucknow) च्या डॉ. राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (Lohia University) मध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला आहे. मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मुलीचे वडील आयपीएस अधिकारी आहेत. अनिका रस्तोगी असे मृत मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी वसतिगृहाच्या खोलीत होती. बराच वेळ ती दार उघडत नव्हती. त्यामुळे खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. यावेळी अनिका खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मुलीच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजेल. अद्याप कॉलेज प्रशासन किंवा पोलिसांकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. IPS संतोष रस्तोगी यांची मुलगी अनिका रस्तोगी हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. अनिका लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. (हेही वाचा -Chhattisgarh Shocker: रेल्वे ट्रॅकवर मोबाईलवर गेम खेळणाऱ्या दोन मुलांचा रेल्वे अपघातात मृत्यू)
दरम्यान, फर्रुखाबाद येथील दोन दलित मुलींचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला असून मुलींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. मुलींच्या पालकांनी किशोरवयीन मुलांची लैंगिक अत्याचारानंतर हत्या केल्याचा आरोप केला आहे. (हेही वाचा - Death Due to ‘Oxygen Deficiency’: लडाखमध्ये सोलो बाईक ट्रिपवर गेलेल्या व्यक्तीचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू)
16 आणि 18 वर्षे वयोगटातील मुली मंगळवारी सकाळी भगौतीपूर गावात त्यांच्या दुपट्ट्याच्या साहाय्याने आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्या. त्या आदल्या रात्री कृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जवळच्या मंदिरात गेल्या होत्या. परंतु, नंतर त्या घरी परतल्याचं नाहीत.