Chhattisgarh Shocker: रेल्वे ट्रॅकवर मोबाईलवर गेम खेळणाऱ्या दोन मुलांचा रेल्वे अपघातात मृत्यू
पद्मनाभपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिसाली भागात 14 वर्षे वयोगटातील दोन मुलांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. रेल्वे ट्रॅकवर बसून मोबाईलवर गेम खेळत असताना शनिवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
Chhattisgarh Shocker: छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात रेल्वे ट्रॅकवर बसून मोबाईलवर गेम खेळत (Boys Playing Games )असताना दोन मुलांचा रेल्वे धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. पद्मनाभपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिसाली भागात 14 वर्षे वयोगटातील दोन्ही मुले रेल्वे ट्रॅकवर बसली असताना शनिवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पूरण साहू आणि वीर सिंग अशी मृत मुलांची नावे आहेत. दोघे मृत मुले भिलाई शहरातील रिसाली सेक्टरमधील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले जात आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, दोघेही मोबाईल फोनमध्ये इतके मग्न होते की त्यांना दल्ली राजहरा-दुर्ग लोकल ट्रेनचा हॉर्न ऐकू आला नव्हता. ट्रेनने मुलांना धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढी कारवाई करत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Sep 01, 2024 03:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

