सुषमा स्वराज यांच्या शस्त्रक्रियेविषयी पती स्वराज कौशल यांनी केला खुलासा
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्या निधनाला तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. परंतु, तरीदेखील लोक आजही त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने आठवण काढतात. एम्सचे डॉक्टर्स सुषमा स्वराज यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यास तयार नव्हते, अशी माहिती त्यांचे पती स्वराज कौशल (Swaraj Kaushal) यांनी ट्विटरवरून दिली आहे.
सुषमा स्वराज यांनी किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी भारताबाहेर जाण्यास नकार दिला होता. (हेही वाचा - Sushma Swaraj Love Story: कुटुंबियांचा विरोध तरीही सुषमा स्वराज यांनी स्वराज कौशल यांच्याशी बांधली लग्नगाठ)
स्वराज कौशल यांचे ट्विट -
सुषमा यांनी आपल्या शस्त्रक्रियेची तारीख ठरवली आणि डॉ. मुकुट मिन्ज यांना म्हणाल्या, तुम्ही फक्त साहित्य पकडा माझी सर्जरी कृष्णा करतील, असं स्वराज यांनी लिहिलेल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. शस्त्रक्रियेनंतर सुषमा स्वराज यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. आपण जर परदेशात जाऊन शस्त्रक्रिया केली असती, तर आपल्या देशातील रूग्णालयांवरून आणि आपल्या देशातील डॉक्टरांवरून लोकांचा विश्वास उडाला असता. दरम्यान, ती एक छोटी शस्त्रक्रिया होती, असंही सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या, असंही त्यांच्या पतीने सांगितलं आहे.
सुषमा स्वराज यांच्या शस्त्रक्रियेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली केली होती. तसेच शस्त्रक्रियेदरम्यान, मोदी डॉक्टरांच्या संपर्कात होते. त्यामुळे मी आणि माझी मुलगी बासुरी कायम त्यांचे आभारी राहू, असंही स्वराज यांनी ट्विटरमध्ये नमूद केले आहे.