Uttar Pradesh: प्रियकरासोबत एकत्र पाहिल्याने बहिणीने केली भावाची निर्घृण हत्या; प्रयागराज जिल्ह्यातील धक्कादायक घटना
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यात एका मुलीने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या लहान भावाची निर्घृण हत्या केली.
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशच्या प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात एका मुलीने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या लहान भावाची निर्घृण हत्या केली आहे. बहिणीला आणि प्रियकराला एकत्र पाहिल्यामुळे या निरागस मुलाला आपला जीव गमवावा लागला. पोलिसांनी आरोपी बहिणीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. प्रयागराजमधील कौंडियारा येथील बडगोहना येथे ही घटना घडली. गुरुवारी सकाळी पलंगावर 14 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला. मुलाची हत्या नेमकी कोणी केली, हे घरातील लोकांना समजलं नाही. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आली. एसपी धवल जयस्वाल यांनी सांगितले की, मुलाची हत्या झाली त्या दिवशी घरात फक्त भाऊ-बहीण होते. त्यादिवशी कुटुंबातील इतर सदस्य नातेवाईकाकडे गेले होते. त्यामुळे बहिणीने रात्री तिच्या 19 वर्षीय प्रियकराला घरी बोलावले. मात्र, रात्री भावाने बहिणीला आणि तिच्या प्रियकरासोबत पाहिले आणि त्याने वडिलांना सर्व प्रकार सांगणार असल्याचे सांगितले. (हेही वाचा - Murder-Suicide: आर्थिक तंगीला कंटाळून एका तरूणाने संपूर्ण कुटुंबालाच संपवले; स्वत:ही झाडाला गळफास लावून केली आत्महत्या)
आपले रहस्य उघडकीस येणार या भीतीने मुलीने आणि तिच्या प्रियकराने एकत्रितपणे लोखंडी रॉडने भावाची हत्या केली. त्यानंतर प्रियकर घटनास्थळावरून फरार झाला. विशेष म्हणजे सकाळी आरोपी मुलीनेचं तिच्या कुटुंबातील सदस्यांना, शेजाऱ्यांना आणि ग्रामस्थांना भावाच्या हत्येची माहिती दिली. आपल्या भावाची हत्या कोणी केली, यासंदर्भात आपल्याला काहीही माहित नसल्याचंही तिने शेजाऱ्यांना सांगितले.
प्राथमिक चौकशीत पोलिसांनी बहिणीवर संशय घेतला. त्यानंतर, पोलिसांनी मुलीचा मोबाइल पाहिला. त्यावर आलेल्या कॉल डिटेल्सवरून संपूर्ण प्रकरणाचे गूढ उघडकीस आले. पोलिसांनी हत्येमध्ये वापरण्यात आलेला लोखंडी रॉड ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी आरोपी बहिणीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.