काँग्रेस नेता सिद्धारमय्या यांच्याकडून भाजप विरोधात वादग्रस्त विधान; थेट वेश्यांसह केली तुलना

परंतु काही वेळातच त्यांनी आपले विधान बदलून हे विधान जेडीएससाठी नसून भारतीय समाज वादी पार्टीसाठी होते, असे त्यांनी स्पष्ट केले. एका पत्रकारने विचारलेल्या प्रश्नांना सिद्धारमय्या यांनी वादग्रस्त उत्तर दिले होते. सिद्धारमय्या यांनी जेडीएस पक्षाची तुलना वेश्यांशी केली होती. ज्या वेश्याला (Prostitutes) नाचता येत नाही, त्यांना डान्स फ्लोअरच्या (Dance Floor) बाबतीत प्रश्न निर्माण होतात, असे विधान त्यांनी केले होते.

Siddaramaiah( फोटो: पीटीआय)

कर्नाटकचे (Karnataka) माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) वरिष्ठ नेता सिद्धारमय्या (Siddaramaiah) यांनी जेडीएसच्या कार्यकर्त्यांच्या (JDS Workers) बाबतीत वादग्रस्त विधान केले होते. परंतु काही वेळातच त्यांनी आपले विधान बदलले असून हे विधान जेडीएससाठी नसून भारतीय जनता पार्टीसाठी होते, असे त्यांनी स्पष्ट केले. एका पत्रकारने विचारलेल्या प्रश्नांना सिद्धारमय्या यांनी वादग्रस्त उत्तर दिले होते. सिद्धारमय्या यांनी जेडीएस पक्षाची तुलना वेश्यांशी केली होती. ज्या वेश्याला (Prostitutes) नाचता येत नाही, त्यांना डान्स फ्लोअरच्या (Dance Floor) बाबतीत प्रश्न निर्माण होतात, असे विधान त्यांनी केले होते.

सिद्धारमैया यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, सिद्धारमय्या हे त्यांचे विधान स्पष्ट करत म्हणाले की, ज्या वेश्याला नाचता येत नाही, ते डान्स फोअरच्या बाबातीत तक्रार करत नाही. त्यांनी हे वक्तव्य जेडीएस पक्षाला नव्हे तर, भाजप पक्षाला उद्देशून म्हणाले असल्याचे सांगितले आहे. हे देखील वाचा-घरकुल घोटाळाः शिवसेना नेते सुरेश जैन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व 48 आरोपी दोषी

माहितीनुसार कर्नाटकात काँग्रेस- जेडीएसची सरकार 22 जुलै रोजी पडली होती. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी द्वारा सादर केलेला विश्वासनीय प्रस्ताव विधानसभेत पडला होता. त्यांची सरकार केवळ 14 महिने होती.