धक्कादायक! अमेरिका येथे भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या

ही घटना अमेरिकेच्या लॉस एंजिलिस (Los Angeles) शहारात शनिवारी पहाटे घडली.

प्रातिनिधीक प्रतिमा (Gun-encounter)

अमेरिका (America) येथे भारतीय नागरिकाची (Indian Citizen) गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना अमेरिकेच्या लॉस एंजिलिस (Los Angeles) शहारात शनिवारी पहाटे घडली. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून अमेरिकी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपीने संबंधित व्यक्तीवर गोळीबार केल्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तसेच मृत व्यक्ती हा नोकरी करण्यासाठी गेल्या 6 महिन्यापूर्वी अमेरिकेत गेला होता. परंतु, त्याच्यावर झालेल्या गोळीबारामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले आहे. तसेच या हत्या मागे काय कारण आहे, याचाही शोध घेतला जात आहे.

मनिंदर सिंह (31 वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील रहिवासी आहे. मनिंदर सिंह व्हिटियर शहरातील किरणामालाच्या दुकानात नोकरी करत होता. गेल्या 6 महिन्यापूर्वी तो अमेरिकेत नोकरीच्या निमित्त गेला होता. मनिंदर सिंह याचे लग्न झाले असून त्याला दोन लहान मुले असल्याची माहिती मिळाली आहे. महत्वाचे म्हणजे, मनिंदर कुटुंबामध्ये एकमेक कर्ता व्यक्ती होता. मनिंदरला जो काही पगार मिळत असे तो त्यांच्या कुटुंबियांना पाठवून द्यायचा, अशी माहिती मनिंदरच्या नातेवाईकांनी दिली. शनिवारी पहाटे 5. 43 च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मनिंदर याची हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला असून त्याचा व्हिटियर पोलीस शोध घेत आहे. हे देखील वाचा-Donald Trump India Visit: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा अमेरिकेसाठी आहे महत्त्वाचा, कारण घ्या जाणून

व्हिटियर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'शनिवारी पहाटे 5.43 वाजता ही घटना घडली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीचा फोटो जारी केला आहे. कोणतेही कारण नसताना आरोपीने गोळीबार केला त्यामध्ये मनिंदर सिंह याचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला. आरोपीने तोंड झाकलेले होते. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif