Sarkari Naukri: केंद्र सरकारच्या Group B, Group C अधिकारी भरतीसाठी आता CET परीक्षा होण्याची शक्यता

दरम्यान एकाच संस्थेमार्फत सीईटी घेण्याची शक्यता आहे.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवण्यासाठी इच्छुकांना सध्या स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून घेण्यात येणार्‍या परीक्षा द्याव्या लागतात. त्यानंतर मुलाखत आणि अंतिम निवड चाचणी घेतली जाते. मात्र आता केंद्र सरकारमध्ये  Group B, Group C अधिकारी भरतीसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान एकाच संस्थेमार्फत सीईटी घेण्याची शक्यता आहे. 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांच्या निवृत्ती वयाबाबत मोदी सरकारचा दिलासादायक निर्णय; 33 वर्षांची नोकरी किंवा वयाच्या साठीत रिटायरमेंट नाही.

युपीएससी दरवर्षी IAS, IFS, IPS, IFOS यासोबतच ग्रुप ए, ग्रुप बी मधील राजपत्रित (गॅझेट) पदांसाठीदेखील परीक्षा घेतली जाते. मात्र आता केंद्र सरकरमधील उच्च पदस्थ अधिकार्‍यांच्या नोकरभरतीमध्ये सुधारणा आणि सुसूत्रता आणण्यासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा सरकार विचार करत आहे. केंद्रीय श्रम मंत्रालयाकडून या विचार केला जात आहे. Sarkari Naukri 2019 WBPSC Recruitment: 'असिस्टंट प्रोफेसर' पदासाठी 167 जागांवर होणार भरती; 19 डिसेंबरपूर्वी pscwbonline.gov.in वर करा ऑनलाईन अर्ज!

श्रम मंत्रालयाच्या या निर्णयावर केंद्र सरकारमधील सारी मंत्रालयं, विभाग, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि सामान्यांकडूनही सूचना मागवण्यात आल्या आहेत. सरकारकडून काही परीक्षा ऑनलाईन तर काही स्किल टेस्ट आहेत. त्यामुळे दरवर्षी सुमारे अडीच कोटी उमेदवार परीक्षा देतात तर सुमारे सव्वा लाख पदांसाठी सतत परीक्षांचे आयोजन केले जाते. जर एकाच संस्थेने सीईटी परीक्षा घेतल्यास त्या ऑनलाईन स्वरूपात होतील. उमेदवारांनाही त्याचा फायदा होईल असे श्रम मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.