Uttar Pradesh Shocker: निवृत्त टपाल विभागाचे लिपीक यांची राहत्या घरात आत्महत्या, कौटुंबिक नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल

त्याने स्वत: वर परवाधानधारक डबल बॅरल बंदूकीने गोळी झाडून आत्महत्या केली.

Suicide, depression प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Uttar Pradesh Shocker:  उत्तर प्रदेशातील लखनौ येथील राजाजीपूरम परिसरात सरकारी टपाल विभागातील निवृत्त लिपिका आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने स्वत: वर परवाधानधारक डबल बॅरल बंदूकीने गोळी झाडून आत्महत्या केली. कुटुंबियांना गोळीचा आवाज ऐकताच घरात प्रवेश केला. त्यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली. या घटनेनंतर परिसरात शोक पसरला आहे.( हेही वाचा- धक्कादायक, लोकलमधून पडून आणखी एका तरुणाने गमावला जीव)

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी नारायण त्रिवेदी असं आत्महत्या करणाऱ्या निवृत्त लिपिकाचे नाव आहे. कौटुंबिक नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती समोर येत आहे.  काल रात्री लक्ष्मी यांचे मुलगा आणि पत्नी सोबत भांडण झालं होते. काही कारणांवरून त्यांच्यात जोरात वाद झाला होता अशी माहिती शेजारच्यांनी पोलिसांना दिली. भांडणानंतर त्यांची पत्नी त्यांना सोडून लखनौ येथील आलमबाग येथे माहेरी गेली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा शिव कॉलनीतील एका मित्राच्या घरी गेला होता.

घरी कोणी नसतात लक्ष्मी यांनी परवानाधारक बंदूकीने स्वत:वर गोळी झाडली. गोळीच्या आवाजाने शेजारच्यांनी पाहिले तेव्हा लक्ष्मी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेची माहिती शिव आणि त्यांच्या पत्नीला देण्यात आली. माहिती मिळताच, पोलिस ही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लक्ष्मी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या डोक्यात गोळी लागून अधिक रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिस या प्रकरणी पुढील तपासणी करत आहे.