प्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू बबिता फोगट हिने आपल्या पतीसोबत लग्नात घेतले आठ फेरी, या मागचे कारण ऐकून तुमचेही डोळे पाणावल्याखेरीज राहणार नाही
तिने आपल्या पतीसोबत म्हणजेच भारतीय केसरी कुस्तीपटू विवेक सुहागबरोबर (Vivek Suhagar)आठ फेरे घेतले.
प्रत्येक भारतीयाला आपल्या लग्नपद्धतीवर अभिमान आहे. मग त्यातील कन्यादान असो वा सप्तपदी. या प्रत्येकाचे विशेष महत्व आहे. त्यामुळे या आपल्या भारतीय विवाह पद्धतीला खूप मान दिला जातो. लग्नात सात फेरे घेतले जातात हे आपल्या सर्वांना माहितच आहे पण तुम्ही लग्नात वधू-वरांना आठ फेरे घेतलेले ऐकले आहे का? ऐकून धक्का बसला ना पण हो असं घडलय. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, प्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू बबिता फोगट (Babita Phogat) हिच्या लग्नात असा प्रकार घडलाय. तिने आपल्या पतीसोबत म्हणजेच भारतीय केसरी कुस्तीपटू विवेक सुहागबरोबर (Vivek Suhagar)आठ फेरे घेतले.
हा प्रकार लग्नात आलेल्या प्रत्येकासाठी खूपच आश्चर्यकारक असा होता. मात्र त्यानंतर तिने या आठवा फेरा घेण्याचे कारण सांगितले.
हेदेखील वाचा- बाईक दिली नाही म्हणून भर लग्नातून नवरदेव झाला फरार , हुंडा मागणी केल्याचा गुन्हा दाखल
हा आठवा फेरा 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' यासाठी घेण्यात आला असे तिने सांगितले. इतकेच नव्हे तर या लग्नात हुंडा न घेता केवळ एक रुपयांत कन्यादान केले. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाव्यतिरिक्त अनेक परदेशी पैलवानही या लग्नाच्या कार्यक्रमास पाहुणे म्हणून उपस्थित होते. बबीता आणि विवेक यांचे रविवारी अतिशय सोप्या पद्धतीने हे लग्न झाले.
या लग्नात केवळ 21 पाहुण्यांनी हजेरी लावली. तथापि, आज म्हणजेच 2 डिसेंबर रोजी दोन्ही पक्षांनी दिल्लीत एक मोठे रिसेप्शन ठेवले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्यासह देश-विदेशातील अनेक नेते, कुस्तीपटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.