Madhya Pradesh Shocker: 60 वर्षाच्या वृध्द महिलेवर बलात्कार, आरोपी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल; मध्य प्रदेशातील खळबळजनक घटना

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एक लाजिरवाणी घटना घडली आहे. रिक्षाचालकाने एका वृध्द महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Representative Image

Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एक लाजिरवाणी घटना घडली आहे. रिक्षाचालकाने एका वृध्द महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाकालेश्वर मंदिराच्या परिसरात राहणाऱ्या महिलेसोबत ही घटना घडली आहे. आरोपीने तीच्यावर ऑटो रिक्षात बसवून एका निर्जन ठिकाणी नेले आणि तीच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. (हेही वाचा- दिल्लीतील ल्युटियन्समध्ये एकाच क्रमांकाच्या 2 एसयूव्ही आढळल्या)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला 19 मार्च रोजी 9.30 वाजता काम आटोपून घरी जात होती. दरम्यान वाटेत ऑटोरिक्षा आला आणि तिला ओळखतो असं सांगून  तीला रिक्षात बसवले. तिच्याशी संवाद साधत मैत्री बनवली. रिक्षा चालकाने चालकीने तीला एका निर्जनस्थळी घेऊन गेला. त्यानंतर महिलेवर बळजबरीने अंगला स्पर्श केला. पीडित महिला पळून जाण्याच्या प्रयत्नात होती परंतू ती अपयशी ठरली. त्याने तीच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोप घटना स्थळावरून पळून गेला.

या धक्कादायक घटनेची माहिती महिलेने पोलिस ठाण्यात दिली. या घटनेमुळे ती आजारी पडली आणि तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव सलमान असल्याचे समोर येत आहे.  यापूर्वी 24 सप्टेंबर 2023 रोजीही एका ऑटो-रिक्षा चालकाने सतना जिल्ह्यातील एका 14 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार केला होता, ज्याने देशभरात खळबळ उडाली होती. तो गुन्हा महाकाळ पोलिस ठाण्यात दाखल झाला असून त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement