उत्तर प्रदेशातील हाथरस, बलरामपूर घटनेनंतर आता प्रतापगडमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक

याप्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी घरात एकटी असताना आरोपींने तिच्यावर बलात्कार केला.

Representational Image | (Photo Credits: File Photo)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हाथरस, बलरामपूर आणि इतर अनेक जिल्ह्यांनंतर आता प्रतापगडमध्ये (Pratapgarh) दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी घरात एकटी असताना आरोपींने तिच्यावर बलात्कार (Rape) केला.  दरम्यान, आज पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, ही घटना रविवारी घडली. 17 वर्षीय मुलगी रात्री आपल्या घरात झोपली होती. त्यानंतर आरोपींनी गच्चीवरून मुलीच्या खोलीत प्रवेश केला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. (हेही वाचा - Rewa Widow Women Gangrape: हाथरसनंतर मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार; 4 जण ताब्यात)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव चंद्रकेश वर्मा असे आहे. घटनेच्या वेळी ही मुलगी आपल्या घरात एकटी होती. आरोपीने याचा फायदा घेत पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर सोमवारी पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. (हेही वाचा - Uttar Pradesh Bhadohi Rape Case: उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्यात 44 वर्षीय दलित महिलेवर चार जणांकडून सामूहिक बलात्कार, दोन आरोपींना अटक)

पीडितेच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पीडितेवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. देशात बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.