Coronavirus: कोरोना व्हायरस विरोधात लढा देण्यासाठी रेल्वे मंत्री पीयूष गोयल, खासदार सुरेश अंगडी 'पंतप्रधान केअर फंड'ला एक महिन्याचा पगार देणार
यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 850 हून अधिक झाली आहे. त्यामुळे देशाला कोरोनाशी लढण्यासाठी मनोबल तसेच आर्थिक मदतीची गरज आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला 'पंतप्रधान केअर फंड'ला आर्थिक मदत देण्याचं आवाहन केलं आहे.
Coronavirus: कोरोना व्हायरस विरोधात लढा देण्यासाठी रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Railways Minister Piyush Goyal), खासदार सुरेश अंगडी (MoS Suresh Angadi) 'पंतप्रधान केअर फंड'ला (PM-CARES Funds) एक महिन्याचा पगार देणार आहेत. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. याशिवाय देशातील 13 लाख रेल्वे कर्मचारी पंतप्रधान केअर फंडसाठी 151 कोटी रुपये देणार आहेत.
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 850 हून अधिक झाली आहे. त्यामुळे देशाला कोरोनाशी लढण्यासाठी मनोबल तसेच आर्थिक मदतीची गरज आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला 'पंतप्रधान केअर फंड'ला आर्थिक मदत देण्याचं आवाहन केलं आहे.दरम्यान, अनेक मोठं-मोठ्या उद्योजकांनी देशासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनामुळे देशात मास्क, सॅनिटायझर आणि व्हेंटिलेटर्स तसेच विविध वैद्यकिय साधनांची मागणी वाढली आहे. त्यामुळे ही साधने विकत घेण्यासाठी देशाकडे निधी असणं आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून नरेंद्र मोदी यांनी जनतेला देशासाठी आर्थिक मदत देण्याचं आवाहन केलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे कोरोना व्हायरस संटकाविरुद्धच्या लढ्यात योगदान, एक महिन्याचे वेतन मदत म्हणून देणार; 29 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला देशातील अगदी सर्वसामान्यांपासून ते मोठं- मोठ्या उद्योजकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. याशिवाय महाराष्ट्रातदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मुख्यमंत्री निधीस आर्थिक सहाय्य करण्याचं आवाहन केलं आहे. ठाकरे यांच्या या आवाहनानंतर राज्यातील अनेक दिग्गजांनी तसेच सर्वसामान्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.