Railway Recruitment 2019: खुशखबर! भारतीय रेल्वेत सुरु झाली नोकरभरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्जाच्या अंतिम तारखा

नॉर्दर्न डिव्हिजनसाठी हे अर्ज मागवण्यात आले असून, दिल्ली येथे पोस्टिंग दिले जाईल. यामध्ये क्लर्क, कन्सल्टंट, सीनियर रेसिडेंट इ. पदांचा समावेश आहे

Representational Image (Photo Credits: PTI)

नॉर्दर्न रेल्वेमध्ये (North East Frontier Railway) विविध पदांसाठी नोकर भरती (Recruitment) सुरु आहे. रेल्वे भरती बोर्डाने एक परिपत्रक जारी करून याबद्दल माहिती दिली आहे. नॉर्दर्न डिव्हिजनसाठी हे अर्ज मागवण्यात आले असून, दिल्ली येथे पोस्टिंग दिले जाईल. यामध्ये क्लर्क, कन्सल्टंट, सीनियर रेसिडेंट इ. पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेची अधिकृत वेबसाइट nr.indianrailways.gov.in वर अधिक माहिती घेऊन शकतात. इथेच तुम्ही अर्जही करू शकता. तर जाणून घ्या या पदांसाठी काय आहे पात्रता आणि महत्वाच्या तारखा.

या पदांसाठी भरती -

अर्जाची अंतिम तारीखः 10 जून 2019

पोस्टिंग क्षेत्रः नवी दिल्ली

आवश्यक पात्रताः पदवी

अर्जाची अंतिम तारीख: 15 जून 2019

पोस्टिंग क्षेत्रः नवी दिल्ली

आवश्यक पात्रता: पदवी

अर्जाची अंतिम तारीख: 14 जून 2019

पोस्टिंग क्षेत्रः नवी दिल्ली

आवश्यक पात्रता: एमएस/एमडी, डीएनबी, एमबीबीएस

अर्जाची अंतिम तारीख: 26 जून 2019

पोस्टिंग क्षेत्रः नवी दिल्ली

पात्रता: स्टेशन मास्टर, गुड्स गार्ड (पदवी), ज्युनियर इंजीनियर (डिप्लोमा, बीएससी)

दरम्यान, भारतामध्ये सध्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जोरात चालू आहे. या प्रकल्पामध्येही नोकर भरती चालू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने कर्मचाऱ्यांच्या प्रथम बॅचसाठी जाहिरात दिली आहे. स्टेशन ऑपरेशन्स, ट्रेन ऑपरेशन्स, रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अशा मिड लेव्हल पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.