Coronavirus: भारतात 10 लाख लोकांमागे फक्त 149 कोरोना चाचण्या; राहुल गांधी यांचा दावा
भारताने कोरोना चाचणी किट (Corona Test Kit) खरेदी करण्यास उशीर केला असून देशात 10 लाख लोकांमागे केवळ 149 चाचण्या होत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
Coronavirus: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कोरोनाच्या आवश्यक त्या प्रमाणात चाचण्या (Coronavirus Test) होत नसल्याचा दावा करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारताने कोरोना चाचणी किट (Corona Test Kit) खरेदी करण्यास उशीर केला असून देशात 10 लाख लोकांमागे केवळ 149 चाचण्या होत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी इतर देशातील चाचणीचा संदर्भ देत हा आकडा वाढवण्याची गरज असल्याचा सल्ला सरकारला दिला आहे. समूहाची तपासणी करणे हेच कोरोना विरोधातील लढ्यातील प्रमुख अस्त्र आहे. पण सध्याच्या घडीला आपण खूप मागे आहोत, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Corona Update: भारतात कोरोना विषाणूचे थैमान; गेल्या 24 तासात 29 लोकांचा मृत्यू, तर 1 हजार 463 नव्या रुग्णांची नोंद)
राहुल गांधी यांनी यापूर्वीदेखील कोरोना संकटावर भाष्य केलं होतं. कोरोनामुळे देशाची वाटचालही आर्थिक संकटाच्या दिशेने होत असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. भारतात 10 हजार पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 300 पेक्षा जास्त लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.