Ragging in Bengaluru: खासगी कॉलेजच्या बीबीए एव्हिएशनच्या ज्युनिअर विद्यार्थ्यीची रॅगिंग, तीन सिनिअर्सवर कारवाई

सिनिअर्स विद्यार्थ्यांकडून एका विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आहे. खासगी महाविद्यालयातील बीबीए एव्हिएशनच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याला मारहाण केली

Seniors ragged with 19 junior students

Ragging in Bengaluru: कर्नाटकातील एका खासगी कॉलेजमध्ये ज्यूनिअर विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिनिअर्स विद्यार्थ्यांकडून एका विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आहे. खासगी महाविद्यालयातील बीबीए एव्हिएशनच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याला मारहाण केली. या घटनेत पीडित विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याचे हात फ्रॅक्चर झाले आहे. (हेही वाचा- वैद्यकीय आस्थापनातील 'आर्थिक गैरव्यवहार' प्रकरणी आरजी कार रुग्णालयाचा माजी प्राचार्य संदीप घोषला अटक; 15 दिवसांहून अधिक काळापासून सुरु होती चौकशी)

मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळीस विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला. आरोपी आणि पीडित विद्यार्थी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्याला दाढी आणि मिशी काढण्यासाठी सांगितली होती परंतु त्याने नकार दिल्यामुळे वरिष्ठ विद्यार्थ्यांनी त्याला मारहाण केली. मारहाणीत पीडित गंभीर जखमी झाला आहे. सरथ,  विष्णू  आणि झेविएर असं मुख्य आरोपीचे नाव आहे. पीडित विद्यार्थी केरळ येथील हादो सिद्दापूर येथील रहिवासी आहे.

पीडितेवर रात्रीच्या वेळीस हल्ला

पीडितेने या प्रकरणी पोलिसांना तक्रार केली. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. पीडितेने पोलिसांना सांगितले की, एकाने फोन करून शुक्रवारी चर्च येथे बोलावून घेतले. तेथे गेल्यानंतर त्यांनी क्लीन शेव न केल्यामुळे भांडण सुरु केले. त्यानंतर तिघांन्ही हल्ला केला. वरिष्ठांचे ऐकत नाही म्हणून बेदम मारहाण आणि शिवीगाळ केली. तेथे आणखी सात ते आठ जण होते. त्यांनी ही हल्ला केला. कसाबसा तरी तेथून निघाल्यानंतर मित्राने रुग्णालयात दाखल केले.

गुन्हा दाखल 

या घटनेची माहिती कॉलेजच्या व्यवस्थापनाला देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला. तिघांवर रॅगिंग संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. बेंलादूर पोलिसांना या प्रकरणी  कलम 118, 126, 189,190, 191, 351 अंतर्गत गुन्हा दाखल केला.  या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.