Sandip Ghosh Arrested: वैद्यकीय आस्थापनातील 'आर्थिक गैरव्यवहार' प्रकरणी आरजी कार रुग्णालयाचा माजी प्राचार्य संदीप घोषला अटक; 15 दिवसांहून अधिक काळापासून सुरु होती चौकशी
सीबीआयच्या तपासात सहभागी होण्यासाठी संदीप घोष दररोज सकाळी कोलकात्यातील सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये यायचा आणि संध्याकाळी किंवा रात्री घरी परतायचा. मात्र सोमवारी सायंकाळी सीबीआयचे अधिकारी घोष याला घेऊन सीजीओ संकुलातून बाहेर पडले.
Sandip Ghosh Arrested: प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाचा आणि पश्चिम बंगालच्या सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील आर्थिक अनियमिततेचा तपास करणाऱ्या सीबीआयने, हॉस्पिटलचा माजी प्राचार्य संदीप घोष याला अटक केली आहे. घोष याला त्याच्या कार्यकाळात आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील आर्थिक अनियमिततेच्या चौकशीत अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सीबीआय संदीप घोषची चौकशी करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, घोष याला आर्थिक अनियमिततेशी संबंधित एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सीबीआय एफआयआरमध्ये, कथित आर्थिक अनियमिततेच्या संदर्भात कलम 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीबीआयने वैद्यकीय महाविद्यालयाचा माजी प्राचार्य संदीप घोष याची पॉलीग्राफ चाचणी केली होती. मात्र, त्यात काय माहिती समोर आली आहे, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. (हेही वाचा: Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात रुग्णालयाच्या प्राचार्यांचा राजीनामा)
आरजी कार रुग्णालयाचा माजी प्राचार्य संदीप घोषला अटक-
News Alert ! CBI arrests ex-RG Kar Hospital principal Sandip Ghosh over 'financial misconduct' in the medical establishment: Official. pic.twitter.com/XV0R0KmwPA
— Press Trust of India (@PTI_News) September 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2024 10:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

