PM Narendra Modi Will Address The Nation: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सायंकाळी 4 वाजता देशाला संबोधणार

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या (30 जून, मंगळवारी) सायंकाळी 4 वाजता देशातील जनतेला संबोधित करणार आहेत.

File image of PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या (30 जून, मंगळवारी) सायंकाळी 4 वाजता देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. सध्या देशात कोरोनाचे संकट वावरत असताना लडाखच्या गलवान घाटीत गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी काय घोषणा करतील? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला होता. दरम्यान, त्यांनी भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत केली होती. तसेच भारत जशास तशे उत्तर देशात सक्षम आहे, असा इशाराही त्यावेळी त्यांनी चीनला दिला होता.

पूर्व लडाखमध्ये झालेल्या लष्करी संघर्षानंतर सीमेवर तणाव असून, देशातून चीनला उत्तर देण्याचा सूर उमटत आहे. केंद्र सरकारने सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे चिनी अ‍ॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने सोमवारी टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे देखील वाचा- India-China Border Issue: भारत-चीन सीमा वादाच्या मुद्द्यावरुन भाजप-काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुद्दा मागे पडतोय- मायावती

एएनआयचे ट्विट-

केंद्र सरकारने नुकतीच लॉकडाउन मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. त्यानुसार शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो रेल, सिनेमे, जिम, तलाव, धार्मिक कार्यक्रम 31 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच ककंटेनमेंट झोनबाहेरील केंद्र व राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्थांना 15 जुलैपासून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) कार्मिक व प्रशिक्षण विभाग जारी केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे, सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि वाहतुकीदरम्यान चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement