Year-Ender 2020: प्रणव मुखर्जी, राम विलास पासवान ते मोतीलाल वोरा यांच्यापर्यंत; 'या' प्रमुख राजकीय नेत्यांचे वर्षभरात झाले निधन
यंदा प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee), राम विलास पासवान (Ram Vilas Paswan), अहमद पटेल (Ahmed Patel), तरुण गोगोई (Tarun Gogoi), अमर सिंह (Amar Singh), लालाजी टंडण (Lalji Tandon), सुरेश अंगडी आणि मोतीललाल वोरा (Motilal Vora) आदी नेत्यांचे निधन झाले.
कोरोना व्हायरस मरामारी (Coronavirus Pandemic) संकटामुळे यंदाचे वर्ष अवघ्या जगालाच बाधक ठरले. या संकटाला भारतही अपवाद ठरला नाही. लाखो लोकांचे प्राण कोरोनामुळे गेले. अशात अनेक राजकीय नेत्यांचेही यंदा (सन 2020) निधन झाले. यात प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee), राम विलास पासवान (Ram Vilas Paswan), अहमद पटेल (Ahmed Patel), तरुण गोगोई (Tarun Gogoi), अमर सिंह (Amar Singh), लालाजी टंडण (Lalji Tandon), सुरेश अंगडी आणि मोतीललाल वोरा (Motilal Vora) आदी नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष.
प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee)
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 10 ऑगस्ट 2020 या दिवशी निधन झाले. ते भारताचे 13 वे राष्ट्रपती होते. त्यांनी 2012 ते 2017 या काळात भारताचे राष्ट्रपती म्हणून जबाबदारी भूषवली. दिल्ली येथील आर्मी रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.
राम विलास पासवान (Ram Vilas Paswan)
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक राम विलास पासवान यांचेही याच वर्षी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. गेले प्रदीर्घ काळ त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, बिहार विधानसभा निवडणूक 2020 च्या दरम्यान, दिल्ली येथील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने एनडीए आणि लोजपाला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. (हेही वाचा, Year Ender 2020: वादविवाद! ‘या’ 5 घटनांमुळे यंदाचे वर्ष कोणीच विसरू शकणार नाही)
अहमद पटेल (Ahmed Patel)
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे अत्यंत विश्वासू आणि राज्यसभा खासदार अहमद पटेल यांचेही या वर्षी निधन झाले. त्याची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. 25 नोव्हेंबर 2020 या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
तरुण गोगोई (Tarun Gogoi)
असम राज्याचे प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहिलेल्या तरुण गोगोई यांचेही याव र्षी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. 23 नोव्हेंबर 2020 या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती.
अमर सिंग (Amar Singh)
भारतीय राजकारणातेल मोठे लॉबिस्ट आणि उद्योगपती अशी ओळख असलेले अमर सिंग यांचेही याच वर्षी निधन झाले ते 64 वर्षांचे होते. प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. ते समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर प्रदीर्घ काळ सदस्य राहिले. सींगापूर येथील एका रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
लालजी टंडन (Lalji Tandon)
लालजी टंडन हे मध्य प्रदेशचे राज्यपाल होते. तसेच ते भाजपचे ज्येष्ठ नेतेही होते. 21 जुलै 2020 या दिवशी त्यांचे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. लखनऊ येथील Medanta Hospital येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुरेश अंगडी (Suresh Angadi)
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश अंगडी यांचेही याच वर्षी निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. ते कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करत होते.
मोतीलाल वोरा (Motilal Vora )
दरम्यान, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचे निधन (Veteran Congress Leader Motilal Vora Passes Away) झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्याने ते गेले प्रदीर्घ काळ त्रस्त होते. काल (रविवार, 20 डिसेंबर) त्यांना एस्कॉर्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. हृदयस्पर्षी गोष्ट अशी की कालच त्यांचा वाढदिवस होता. मोतीलाल वोरा (Motilal Vora ) हे प्रदीर्घ काळापासू काँग्रेस (Congress ) पक्षाचे खजीनदार राहिले. त्यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती. दरम्यान, आज (सोमवार, 21 डिसेंबर 2020) त्यांचे निधन झाले.