Devendra Fadnavis On MVA: लोकशाहीच्या इतिहासातील हा काळा दिवस, हे सरकार पळकुटं आणि भित्रं - देवेंद्र फडणवीस

विद्यापिठाच्या कायद्यावर चर्चा सुरु असताना जाणीवपूर्वक आणि ठरवून चर्चा न करता हे विधेयक मंजूर करुन घेतल आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

हिवाळी अधिवेशनाच्या (Last Day of Winter session) अखेरचा दिवस चांगलाच गाजला. विधानसभेत (Assembly) आणण्यात आलेल्या आणि मंजूर करण्यात आलेल्या विद्यापीठ (University) दुरुस्ती विधेयकावरुन जोरदार संघर्ष सुरु झाला. हे विधेयक आणण्याचं आणि घाईघाईनं मजूर करण्याचं पाप महाविकासआघाडी (MVA) सरकारनं केल आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. तसेच हे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील पळकुटं आणि भित्र आहे, आजचा दिवस हा राज्याच्या लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केली आहे. विद्यापिठाच्या कायद्यावर चर्चा सुरु असताना जाणीवपूर्वक आणि ठरवून चर्चा न करता हे विधेयक मंजूर करुन घेतल आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Tweet

फडणवीस पुढे म्हणतात की, "2016 सालच्या कायद्याने विद्यापीठं राजकारणापासून दूर ठेवलं होतं. आता हे चर्चा न करता विधेयक मंजूर करुन घेण्याचं पाप या सरकारने केलं आहे. विधानमंडळातील सचिवालयही यामध्ये सामिल आहे. आतापर्यंतच्या कुठल्याही कायद्यातून मंत्र्यांना विद्यापीठाच्या प्रशासकीय बाबतीत ढवळाढवळ करण्याची तरतूद नव्हती. विद्यापीठं राजकारणापासून दूर ठेवली गेली होती. पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी स्वतःला प्र-कुलपती म्हणवून घेतलं आहे. विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि ऍकेडमिक बाबींमध्ये आता सरकारला हस्तक्षेप करायचा आहे, म्हणून हे केलं गेलं असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला आहे. (हे ही वाचा Maharashtra Winter Session 2021: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुक लांबणीवर पडण्याची शक्यता, राज्यपालांची भूमिका ठाम.)

नव्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात हे विधेयक असल्याची टीका फडणवीसांनी केली. तसेच राज्य सरकारच्या या विधेयकामुळे आता राज्यपालांचे अधिकार कमी होणार असून राज्यातील विद्यापीठांवर अंकुश ठेवण्यासाठी प्र-कुलपतीपद निर्माण करण्यात येणार आहे. या प्र-कुलपतीपदी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असणार आहेत. त्यामुळे विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती आता थेट राज्यपाल करू शकणार नाहीत असेही फडणवींस म्हणाले.