#आणीबाणी ची 44 वर्षे: 'तो' एक निर्णय; माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लागू केली Emergency - दहा मुद्दे
देशभरातून अनेक नेत्यांनी जेलभरो आंदोलनं केली. महाराष्ट्रातही अनेक साहित्यिक इंदिरा गांधी यांच्या विरोधा भूमिका घेत आणीबाणीला विरोधकर्ते झाले. अनेक दैनिकांनी संपादकीय पानावरील अग्रलेखाच्या जागा रिकाम्या सोडत आपला निशेध नोंदवला.
The Emergency of 1975 Ten points: आज तो दिवस आहे. ज्या दिवसाला आज 44 वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस म्हणजे 25 जून 1975. या दिवशीच माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी (Former PM Indira Gandhi) यांनी देशात आणीबाणी लागू केली. 25 जून 1975 रोजी देशात सुरु झालेली आणीबाणी (Emergency) 21 मार्च 1977 रोजी संपली. जाणून घेऊया आणीबाणीबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी.
1) आणीबाणी लागू झाली तेव्हा देशाचे राष्ट्रपती होते फखरुद्दीन अली अहमद. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या शिफारशीनंतर घटनेतील कलम क्रमांक 352 अन्वये देशात आणीबाणी लागू केली. इंदिरा गांधी यांनी 26 जून रोजी राष्ट्रपतींचा हा संदेश देशाला सांगितला.
2) देशाला उद्देशून आकाशवाणीवरुन दिलेल्या संदेशात इंदिरा गांधी यांनी म्हटले होते की, मी देशातील सर्वसामान्य नागरिक आणि महिलांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. तेव्हापासूनच माझ्याविरोधात एक कट रचण्यात येत होता. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या प्रमाणे दूरदृष्टी दाखवावी: उद्धव ठाकरे)
3) देशात आणीबाणी लागू करण्यामागे 12 जून 1975 रोजी इलाहाबाद हायकोर्टाने एका खटल्यात दिलेला इंदिरा गांधी यांच्या विरोधातील खटला असल्याचे कारण सांगितले जाते.
4) इलाहाबाद कोर्टाने इंदिरा गांधी यांना रायबरेली निवडणुकीत सरकारी यंत्राचा दुरुपयोग केल्याबद्दल दोषी ठरवले होते. तसेच, इंदिरा गांधी यांची उमेदवारी रद्द केली होती. या निर्णयानुसार इंदिरा गांधी यांना निवडणूक लढणे आणि कोणत्याही पदावर राहणे याला बंदी होती. हे प्रकरण अचारसंहीतेचा भंग केल्याशी निगडीत होते.
5) न्यायमूर्ती जगमनोहनलाल सिन्हा यांनी हा निर्णय दिला होता. दरम्यान, 24 जून 1975 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला. मात्र, इंदिरा गांधी यांना पंतप्रधान पदाची खुर्ची कायम ठेवण्यास मान्यता दिली.
6) आणीबाणी काळात नागरिकांच्या स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत हक्कांवर मर्यादा आल्याचे सांगण्यात येते.
7) सर्वोच्च न्यायालयाने 2 जानेवारी 2011 मध्ये हे स्वीकारले की देशात आणीबाणी काळात न्यायालयातही नागरिकांच्या स्वतंत्र्याच्या हक्कावर मर्यादा आल्या. आणीबाणी लागू होताच अंतर्गत सुरक्षा कायदा (मीसा) अन्वये राजकीय विरोधकांची धरपकड करण्यात आली.
8) आणीबाणी काळात अनेक लोकप्रिय नेते आणि दिग्गजांना अटक झाली. यात जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नांडिस आणि अटल बिहारी वाजपेयी यांचाही समावेश आहे. साधारण 21 महिने ही आणीबाणी लागू राहील. या काळात अनेक विरोधी नेत्यांना कारागृहात जावे लागले.
9) आणीबाणी लागू केल्यानंतर देशात इंदिरा विरोधी लाट निर्माण झाली. ती पाहून इंदिरा गांधी यांनी लोकसभा विसर्जित करुन सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा, Indira Gandhi Birth Anniversary: भारताच्या Iron Lady इंदिरा गांधींबद्दल काही खास गोष्टी!)
10) सांगितले जाते की, आणीबाणी काळात संजय गांधी आणि त्यांच्या दोस्तांनीच देश चालवला. त्यांनी इंदिरा गांधी यांच्यावर एक प्रकारे प्रभुत्वच मिळवले होते. अर्थात हा दावा केला जातो. इंदिरा गांधी यांचे नेतृत्व कणखर होते.
आणीबाणीमुळे अवघा देश ढवळून निघाला. देशभरातून अनेक नेत्यांनी जेलभरो आंदोलनं केली. महाराष्ट्रातही अनेक साहित्यिक इंदिरा गांधी यांच्या विरोधा भूमिका घेत आणीबाणीला विरोधकर्ते झाले. अनेक दैनिकांनी संपादकीय पानावरील अग्रलेखाच्या जागा रिकाम्या सोडत आपला निशेध नोंदवला.