PM Modi Meets Joe Biden, Jill Biden: PM नरेंद्र मोदी आणि जो बिडेन, फर्स्ट लेडी जिल यांच्यात भेट; ग्रीन डायमंड, Sandalwood Box आणि उपनिषदांची प्रत भेट (Watch Video)

अमेरिकेत राजकिय दौरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि त्यांची पत्नी जिल बिडेन यांना खास भेट वस्तू दिली आहे. 7.5 कॅरेटचा हिरवा हिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल बिडेन यांना देण्यात आला आहे.

twitter- PM Narendra modi

PM Modi Meets Joe Biden, Jill Biden: अमेरीकेच्या राजकिय दौऱ्या आज पतंप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाउस  येथे गेले असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि त्यांची पत्नी जिल बिडेन यांची भेट घेतली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन ह्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या भेटी दरम्यान जिल बिडेन ह्यांना खास भेट वस्तू दिली. अमेरिकेचे राजकिय दौरा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसरे भारतीय नेते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या फस्ट लेडी जिल बिडेन यांना खास भेट वस्तू दिली आहे. प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले खास 7.5 कॅरेटचा हिरवा हिरा भेट वस्तू म्हणून दिली.

कृत्रिम पध्दतीने प्रयोगशाळेत बनवलेला आहे. पर्यावरणास अनुकुल देखील आहे. हा हिरा बनवण्यासाठी पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा वापर करण्यात आले आहे. हा हिरा ज्या बॉक्स मध्ये ठेवण्यात आला आहे त्या बॉक्सला 'कर ए कलमदानी' असे ओळखले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष यांना राजस्थानमधील जयपुर येथील एका कारागिराने हाताने बनवलेला खास चंदनाचा बॉक्स भेट म्हणून दिला. त्यामध्ये गणेश मुर्तीसह दहा वस्तू ठेवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement