PM Modi Swearing-in Ceremony 2019: नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, अरविंद सावंत, संजय धोत्रे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सुरुवातीला मंत्रिपदाच्या चर्चेत शिवसेनेचे अरविंद सावंत, भाजपचे नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू, रावसाहेब दाणवे, संजय धोत्रे या मंडळींची नावं आघाडीवर होती. तर, आगोदरच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या सुभाष भामरे, रामदास आठवले यांचे काय होणार याबातही मोठी उत्सुकता होती. ही सर्व उत्सुकता शपतविधी कार्यक्रमादरम्यान संपत आहे. म्हणूनच जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणकोणत्या खासदारांना मिळाली मंत्रिपदाची संधी.
PM Modi Swearing-in Ceremony 2019: सतराव्या लोकसभेसाठी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर आता भाजप प्रणित एनडीए मंत्रिमंडळातील निवडक खासदार देशभरातून पद आणि गोपनियतेची शपथ घेत आहेत. मोदी मंत्रिमंडळात देशभरातील विविध राज्यांतील खासदारांचा समावेश आहे. यात महाराष्ट्राच्या वाट्याला या वेळी किती मंत्रिपदं येणार? कोणकोणत्या खासदारांना मंत्रेपदाची संधी मिळते याबाबत उत्सुकता होती. सुरुवातीला मंत्रिपदाच्या चर्चेत शिवसेनेचे अरविंद सावंत, भाजपचे नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू, रावसाहेब दाणवे, संजय धोत्रे या मंडळींची नावं आघाडीवर होती. तर, आगोदरच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या सुभाष भामरे, रामदास आठवले यांचे काय होणार याबातही मोठी उत्सुकता होती. ही सर्व उत्सुकता शपतविधी कार्यक्रमादरम्यान संपत आहे. म्हणूनच जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणकोणत्या खासदारांना मिळाली मंत्रिपदाची संधी.
नितीन गडकरी
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि भाजप खासदार नितीन गडकरी यांनी NDA 2 सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. नितीन गडकरी हे NDA 1 सरकारमध्येही केंद्रीय मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचीच जबाबदारी होती. (हेही वाचा, LIVE Modi Cabinet Swearing in Ceremony Live News Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ, अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह ज्येष्ठ मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान)
प्रकाश जावडेकर
केंद्रातील भाजप प्रणीत एनडीए 2 सरकारमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनाही केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA 1 सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जाबादारी होती.
अरविंद सावंत
शिवसेना खासदार अरविंद गणपत सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अरविंद सावंत हे भाजप प्रणित NDA 2 सरकारमधील शिवसेनेचे शपथ घेणारे पहिले आणि एकमेव खासदार आहेत. शिवसेना हा भाजपचा खूप जूना मित्र आहे. हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणूक 2019 युती द्वारे एकत्र लढले होते. एकत्र निवडणूक लढण्याचा दोन्ही पक्षांना मोठा फायदा झाला. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उमेदवार निवडूण आले.
रावसाहेब दादाराव दानवे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सरपंच पदापासून राजकीय वाटचालीची सुरुवात केलेल्या रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे. या आधीच्या सरकारमध्येही ते केंद्रीय मंत्री होते. मात्र, महाराष्ट्र प्रेदेश भाजपची जबाबदारी आल्याने ते पुन्हा महाराष्ट्रात आले. त्यामुळे त्यांना त्या वेळी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. ते जालना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधत्व करतात.
रामदास आठवले यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप आणि एनडीएला सथ दिल्याचा पुरेपूर फायदा रामदास आठवले यांना मिळाला. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची दुसऱ्यांदा संधी मिळाली. दलित चळवळ आणि प्रचंड मोठा जनसंपर्क अशी त्यांची ओळख आहे. एक कवी मनाचा राजकीय नेता अशीही त्यांची ओळख आहे. त्यांचे कोणतेही भाषण हे कविता म्हटल्याशिवाव पूर्ण होत नाही.
अकोलाचे खासदार संजय धोत्रे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
अकोला लोकसभा मतदारसंघातील खासदार संजय धोत्रे यांनी केंद्रीय मंत्री म्हणून मंत्रीपदाची शपथ घेतली. केंद्रीय मंत्री म्हणून धोत्रे यांना पहिल्यांदाच संधी मिळत आहे. ते सलग चार वेळा खासदार म्हणून निवडूण आले आहेत. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातून त्यांनी वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला.