Lok Sabha Elections 2019: केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मध्य प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देणार, राहुल गांधी यांचे वक्तव्य
केंद्रात काँग्रेसची (Congress) सत्ता आल्यास आंध्र प्रदेशाला (Andhra Pradesh) विशेष राज्याचा दर्जा देण्यात येईल.
Lok Sabha Elections 2019: केंद्रात काँग्रेसची (Congress) सत्ता आल्यास आंध्र प्रदेशाला (Andhra Pradesh) विशेष राज्याचा दर्जा देण्यात येईल असे वक्तव्य राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यातसुद्धा राहुल गांधी यांनी आंध्र प्रदेशाला देण्यात येणाऱ्या विशेष दर्जाबद्दल घोषणा केली होती.
विजयवाडा येथे राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या प्रचारसभेच्या वेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी आंध्र प्रदेशातील रहिवाशांना हे आश्वासन दिले आहे. तर काँग्रेस किंवा मनमोहन सिंग यांनी दिलेले हे आश्वासन नसून देशाने दिलेले आश्वासन असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: राहुल गांधी लोकसभा निवडणुक दोन मतदार संघातून लढवणार, काँग्रेस पक्षाकडून अधिकृत घोषणा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेली पाच वर्षे सत्ता असून सुद्धा त्यांनी आश्वासने पूर्ण केली नसल्याची टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली. आंध्र प्रदेशातील राजकीय पक्षांनी या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी मोदी यांच्याकडे केली होती. तरीही त्यांच्या या मागणीकडे मोदी सरकारने कानाडोळा केला असल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत.