Lok Sabha Election Results 2024 Live Updates: लोकसभा निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत; पहा थेट प्रक्षेपण

यंदा एनडीए विरूद्ध इंडिया अलायंस झालेल्या निवडणूकीमध्ये कोणाच्या परड्यात कोणत्या जागा पडणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

05 Jun, 02:21 (IST)

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या निवडणुकीत जनतेला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीतील जनादेशाने सर्व अंदाज खोडून काढले. भाजपला बहुमताचा आकडाही स्पर्श करता आलेला नाही. दोनवेळा स्वबळावर सरकार स्थापन करणाऱ्या भाजपला यावेळी युतीच्या मदतीने सरकार स्थापन करता येणार आहे. एकीकडे अजूनही मतमोजणी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, या पवित्र दिवशी, एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत असल्याची पुष्टी झाली आहे. आम्ही लोकांचे ऋणी आहोत...’

05 Jun, 02:05 (IST)

आंध्र प्रदेशमधील आपल्या पराभवानंतर वायएस जगन मोहन रेड्डी यांनी, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे पत्र त्यांनी राज्यपालांना पाठवले आहे.

05 Jun, 01:40 (IST)

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. यामध्ये महाविकास आघाडीने महायुतीला काट्याची टक्कर दिली आहे. आता लोकसभा निवडणूक 2024 निकालानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेत आहेत. इंडिया आघाडी सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

05 Jun, 01:08 (IST)

भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान खासदार, तेजस्वी सूर्या हे कर्नाटकातील बंगलोर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध कॉंग्रेसने सौम्या रेड्डी यांना उमेदवारी दिली होती.

05 Jun, 24:45 (IST)

पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल (SAD) नेत्या हरसिमरत कौर बादल या भटिंडामधून 49,656 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी आम आदमी पार्टीच्या गुरमीत सिंग खुडियान यांचा पराभव केला आहे.

05 Jun, 24:33 (IST)

अहमदनगरमधून मविआचे निलेश लंके विजयी झाले आहेत. त्यांच्यासमोर सुजय विखे पाटील यांचं आव्हान होते.

05 Jun, 24:30 (IST)

शिवसेना भवन समोर लोकसभा निवडणूक निकालानंतर पोस्टरबाजी  करण्यात आली आहे. त्यांनी 'खरी शिवसेना कुणाची हे जनतेनेच दाखवून दिल्याचंं'  म्हटलं आहे. तसेच पुढील लक्ष्य विधानसभा असं त्यांनी पोस्टर वर लिहलं आहे.

05 Jun, 24:25 (IST)

दक्षिण मुंबई मध्ये Arvind Sawant यांनी लोकसभा निवडणूकीतील विजयानंतर' मातोश्री' वर  ठाकरेंची भेट घेतली  आहे. Aaditya Thackeray यांनी अरविंद सावंत यांचं अभिनंदन करताना त्यांनी घट्ट मिठी मारली आणि आनंद व्यक्त केला आहे.

05 Jun, 24:14 (IST)

TMC chief Mamata Banerjee यांनी निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि INDIA bloc ला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करणार असं म्हटलं आहे.

05 Jun, 24:05 (IST)

Congress General Secretary KC Venugopal केरळ च्या Alappuzha मधून विजयी  झाले आहेत.

04 Jun, 23:51 (IST)

Smriti Irani यांनी अमेठी च्या पराभवानंतर  भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी PM Narendra Modi, CM Yogi Adityanath यांचे आभार मानले  आहेत.

04 Jun, 23:46 (IST)

राहुल गांधी Rae Bareli की Wayanad कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी कायम ठेवणार?  असा प्रश्न विचारला असता त्यांनी अजून काही ठरवले नसल्याचं म्हटलं आहे. तसेच इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार का? याचा देखील अद्याप विचार केला नसल्याचं म्हटलं आहे.

04 Jun, 23:41 (IST)

Jyotiraditya Scindia मध्य प्रदेशा च्या una Lok Sabha seat मधून विजयी  झाले आहेत.

04 Jun, 22:47 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी  वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सुरूवातीच्या 3 कलांमध्ये ते पिछाडी वर गेले होते मात्र नंतर त्यांनी आघाडी घेत विजय नोंदवला आहे. 

04 Jun, 22:42 (IST)

अमरावती मधून नवनीत राणा पराभूत  झाल्या आहेत. भाजपाच्या चिन्हावर लोकसभा निवडणूकीला सामोर्‍या गेलेल्या नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. कॉंग्रेसच्या बाळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला.  

04 Jun, 22:26 (IST)

सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे विजयी  ठरल्या आहेत. कॉंंग्रेसच्या प्रणिती शिंदेंनी भाजपाच्या राम सातपुतेंचा पराभव केला आहे.

04 Jun, 22:20 (IST)

उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. त्यांच्यासमोर अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचं आव्हान होते.

04 Jun, 22:16 (IST)

वायनाड मधून राहुल गांधी विजयी  झाले आहेत. राहुल गांधी वायनाड सोबतच रायबरेली मधून निवडून आले आहेत.

04 Jun, 22:16 (IST)

वायनाड मधून राहुल गांधी विजयी  झाले आहेत. राहुल गांधी वायनाड सोबतच रायबरेली मधून निवडून आले आहेत.

04 Jun, 21:22 (IST)

Anil Desai  यांनी लोकसभा निवडणूकीचं   विजयाचं श्रेय दिलं INDIA alliance च्या अन्य पक्षांना  दिलं आहे. अनिल देसाई यांनी शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे.

Read more


लोकसभा निवडणूकीच्या 543 जागांचे निकाल (Lok Sabha Election Results) आज लागणार आहेत. 18व्या लोकसभेमध्ये कोण खासदार म्हणून निवडले जाणार यासाठी जनतेने दिलेल्या मताचा कौल आज समजणार आहे. एक्झिट पोलच्या (Exit Poll) अंदाजानुसार, नरेंद्र यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एनडीए सत्तेमध्ये येण्याची शक्यता आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसर्‍यांदा पंतप्रधान म्हणून विराजमान होऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा एनडीए (NDA) विरूद्ध इंडिया अलायंस (India Alliance) झालेल्या निवडणूकीमध्ये कोणाच्या परड्यात कोणत्या जागा पडणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

यंदाच्या वर्षी 80 वर्षावरील नागरिकांना घरातूनच मतदान करण्याचा पर्याय देण्यात आला होता त्यामुळे आधी पोस्टल मतं मोजणी आणि नंतर नियमित मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरूवात होणार आहे. भाजपाचं अबकी बार चारसो पार हा नारा सत्यात उतरणार का? हे पाहणं देखील उत्सुकतेचं आहे.

महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी विरूद्ध महायुती या संघर्षामध्ये कोण बाजी मारणार याचीही जनतेला उत्सुकता आहे. राज्यात झालेल्या पक्ष फोडीच्या राजकारणानंतर जनता कुणाच्या बाजूने उभी राहते याची देखील मोठी उत्सुकता आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात ही अटीतटीची लढाई असणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now