कर्नाटक मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना येत्या 18 जुलै रोजी सिद्ध करावे लागणार बहुमत

कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस (JDS)-काँग्रेस (Congress) आघाडी सरकारला येत्या 18 जुलै रोजी बहुमत सिद्ध करावे असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी. (संग्रहित छायाचित्र, Photo Credits: PTI))

कर्नाटक (Karnataka) मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस (JDS)-काँग्रेस (Congress) आघाडी सरकारला येत्या 18 जुलै रोजी बहुमत सिद्ध करावे असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. तर काही दिवसांपूर्वी कुमारस्वामी यांच्या सरकारमधील काँग्रेसच्या 21 मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे प्रकरण सुरु होते. परंतु आता कुमारस्वामी यांना सरकार टिकवायचे असल्यास त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

गुरुवारी कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. त्याचसोबत अविश्वास प्रस्तावावर मतदानसुद्धा पार पडणार असून त्याचा निकाल जाहीर झाल्यावर सरकार राहणार की जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु आजसुद्दा कर्नाटक विधान परिषदेत जोरदार गदारोळ झाल्याने कामकाज थांबवण्यात आले.

(कर्नाटक : काँग्रेस पक्षाच्या 21 मंत्र्यांचा राजीनामा; मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी म्हणतात 'प्रकरण निवळले, सरकारला कोणताच धोका नाही')

तर भाजप पक्षाने जेडीएस-काँग्रेस सरकारच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणावा अशी मागणी केली होती. तसेच भाजपकडून विधासभेच्या अध्यक्षांना नोटीससुद्धा धाडण्यात आली होती. परंतु 6 जुलैपासून कर्नाटकमधील राजकीय अस्थिरता कायम आहे. त्याचसोबत जेडीएस-काँग्रेसच्या जवजवळ 13 आमदारांनी राजीनामा दिल्याने कुमारस्वामी यांच्या डोक्यावरील ताप अधिक वाढला आहे.