अमित शाह यांच्या स्वाईन फ्लू आजारावरुन काँग्रेसने उडविली खिल्ली, दिला कर्नाटक सरकारपासून दूर राहण्याचा सल्ला

काँग्रेस वरिष्ठ नेते आणि राज्यसभा संसदीय बीके हरिप्रसाद (BK Hariprasad) यांनी भाजप (BJP) अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांना झालेल्या स्वाईन फ्लू (Swine Flu) आजारावरुन खिल्ली उडविली आहे.

अमित शहा (फोटो सौजन्य-ट्वीटर)

काँग्रेस वरिष्ठ नेते आणि राज्यसभा संसदीय बीके हरिप्रसाद (BK Hariprasad)  यांनी भाजप (BJP) अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांना झालेल्या स्वाईन फ्लू (Swine Flu) आजारावरुन खिल्ली उडविली आहे. स्वाईन फ्लू आजारावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर हरिप्रसाद यांनी अमित शाह यांना डुकरांना होणार आजार झाला असून त्यांना कर्नाटक राज्याचा श्राप लागल्याचे हास्यास्पद वक्तव्य हरिप्रसाद यांनी केले आहे.

एवढच नसून कर्नाटक (Karnataka) सरकारला हात लावाल तर गंभीर आजार होईल असा टोली ही लगावला आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर एम्स रुग्णालयातील निर्देशक रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. शाह यांनी ट्वीटरवरुन त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे सांगितले. ट्वीटमध्ये अमित शाह यांनी,'मला स्वाईन फ्लू झाला आहे, ज्यावर सध्या उपचार सुरु आहेत. ईश्वराच्या आशिर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमाने मी लवकरच बरा होईन' असे सांगितले आहे. (हेही वाचा-स्वाईन फ्लू: अमित शाह यांच्या आजारपणाचा भाजपवर काय परिणाम होणार?)

काही दिवसांपूर्वी बीके हरिप्रसाद यांनी पंजाब सरकारचे पर्यटन मंत्री नवज्योत सिंह सिध्दू यांच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले होते. ज्यामध्ये सिध्दू यांनी असे म्हटले होते की, चौकीदार तर चोर होता, त्याचा कुत्रा सुद्धा चोराला मिळाला होता. त्यावरुन हरिप्रसाद यांनी असे म्हटले होती की, त्यांच्या नाका खालून चोरी झाली असल्याचे स्पष्टीकरण दिले असून त्यात काय चुकीचे आहे.