Ayodhya-Babri Masjid: 2300 पोलिसांसमोर 1 लाख कारसेवकांनी पाडली अयोध्येत बाबरी मशीद

भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रेचे आयोजन केले होते. या रथयात्रेत 'कसम राम की खाते हैं, मंदिर वहीं बनाएंगे' अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यानंतर या विषयाने हळूहळू राजकीय रंग धारण करण्यास सुरुवात केली.

अयोध्या येथील बाबरी मशीद पाडल्यावर त्याचे देशभरात पडसाद उमटले | ( फोटो क्रेडिट: twitter )

Ayodhya-Babri Masjid Case 6: 6 डिसेंबर 1992 हा दिवस भारताच्या भविष्याला वेगळे वळण देईल याची इतिहासात कोणाला कल्पनाही आली नसेल. पण, असे घडले हा दिवस भारतीय सांस्कृतीक, राजकीय इतिहासात वेगळ्या अर्थाने नोंदला गेला. याच दिवशी अयोध्येत (In Ayodhya) लक्षवधी कारसेवकांनी बाबरी मशीदीचा ( Ayodhya-Babri Masjid) ढाचा पाडला होता. 1992 मध्ये जे घडले त्याची मुळे खरेतर 1990 पासूनच रुजायला सुरुवात झाली होती. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani ) यांनी रथयात्रेचे आयोजन केले होते. या रथयात्रेत 'कसम राम की खाते हैं, मंदिर वहीं बनाएंगे' अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यानंतर या विषयाने हळूहळू राजकीय रंग धारण करण्यास सुरुवात केली. 'एक धक्का और दो, बाबरी मस्जिद तोड़ दो' ही या रंगाची परिसीमा होती. 6 डिसेंबर 1992मध्ये सुमारे १ लाख कारसेवक (Kar Sevak) अयोध्येत दाखल झाले. त्यांनी बाबरी मशीद जमीनदोस्त केली. काय घडले त्या दिवशी घ्या जाणून...

सकाळी साधारण 10.30च्या सुमारास भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी अयोध्येतील वादग्रस्त जागेत पूजा केली. यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक संत, महंतही उपस्थित होते. त्यांच्या पाठीमागे सुमारे 1.5 लाख कारसेवक उपस्थित होते. घटनास्थळावरचे वातावरण पाहून त्याची पोलीसांना माहिती देण्यात आली. साधारण 11.45च्या दरम्यान, डीएम आणि एसएसपी फैजाबाद राम जन्मभूमी परिसरात पाहणी करण्यास आले. त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला.

पोलीस अधिकाऱ्यांना परिस्थितीचा अंदाज काहीसा आला होता. त्यांनी अतिरिक्त कुमक मागवली. परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले. कोणत्याही प्रकारची अनुचीत घटना टाळण्यासाठी 2,300पोलीस तैनात करण्यात आले. मात्र, पोलीसांपेक्षा कारसेवकांची संख्या कितीतरी अधीक होती. साधारण 12 वाजणेच्या सुमारास काही तरुण कारसेवक बाबरी मशीजीच्या घुमटावर चढले. त्यांचे घुमटावर चढणे याचा अर्थ असा होता की, त्यांनी पोलिसांचे सुरक्षाकडे तोडून आत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे बाकीच्या कारसेवकांना इशारा मिळाला. त्यानंतर बाकीचे कारसेवकही सुरक्षा कडे तोडून बाबरी मशीदीच्या दिशेने धावले.(हेही वाचा, ऑर्डर.. ऑर्डर.. अयोध्या जमीन वादावरील सुनावणी आता थेट पुढच्या वर्षी; सर्वोच्च न्यायालय)

साधारण 12.45वाजणेच्या सुमारास कारसेवकांनी मशीदीचा ढाचा खाली पाडला. प्रसारमाध्यमांतून त्या वेळी पुढे आलेल्या माहितीनुसार हे कारसेवक कुदळ, फावडे, टिकाव, हातोडे, घण, रॉड असे इमारत पाडण्यासाठी लागणारी सर्व साधणे सोबत घेऊनच आले होते. बाबरी पाडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ज्यामुळे अयोध्येतील सामाजिक वातावरण बिघडले. उत्तर प्रदेशमध्येही मोठा वाद निर्माण झाला. काही ठिकाणी दंगली उसळल्या. तेव्हापासून मंदिराचा मुद्दा अद्याप वाद्रस्तच राहिला आहे. सद्यास्थितीत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत आहे.