Assembly Elections Results 2018 : मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं काय झालं?
मध्य प्रदेश (Madhya Pradesh) , राजस्थान(Rajasthan) , तेलंगणा (Telangana), मिझोराम(Mizoram) आणि छत्तीसगड (Chhattisgarh) या राज्यात पहा मुख्यमंत्र्यांना पुन्हा जिंकून येणं शक्य झालं आहे का ?
Assembly Elections Results 2018 : अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूक 2018 च्या तयारीसाठी सध्या भारतामध्ये पार पडलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका ही मोदी सरकरची पूर्व परिक्षा समजली जात आहे. तीन राज्यांमधील निकालांचा कल हा कॉंग्रेसच्या बाजूने झुकला आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) , राजस्थान(Rajasthan) , तेलंगणा (Telangana), मिझोराम(Mizoram) आणि छत्तीसगड (Chhattisgarh) या राज्यात पहा मुख्यमंत्र्यांना पुन्हा जिंकून येणं शक्य झालं आहे का ?
तेलंगणा -
तेलंगणा राज्यामध्ये विधानसभा मुदतपूर्व विर्सजित करून के. चंद्रशेखर राव निवडणुकींना सामोरे गेले होते. एक्झिट पोलमध्ये पुन्हा TRS सत्तेमध्ये येणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार TRS बहुमताच्या आकड्यांपार गेला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव 50 हजार मतांनी विजयी झाले आहेत. Telangana Assembly Election Results 2018 : AIMIM नेते अकबरूद्दीन ओवेसी विजयी
मिझोराम -
गेली दहा वर्ष सत्ता असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. मिझोरामचे काँग्रेस नेते, विद्यामान मुख्यमंत्री ललथनहवला (Lalthanhawla) यांचा विधानसभा निवडणूक 2018 मध्ये पराभव झाला आहे. तर गेली दहा वर्ष पु. ललथनहवला यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला होता.
छत्तीसगड -
उत्तरेतील हिंदी भाषिक राज्य ही भाजपा सरकारची बलस्थान समजली जात असे. मात्र छत्तीसगडमध्ये भाजप पिछाडीवर आहे. कॉंग्रेस छत्तीसगडमध्ये आघाडीवर आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग पिछाडीवर आहेत.
राजस्थान -
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे पुन्हा जिंकून आल्या आहे. मात्र राजस्थानमध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येण्याची चिन्ह धुसर झाली आहे. वसुंधरा राजे झालरापाटन या मतदार संघातून 27 हजार 92 मतांनी जिंकून आल्या आहेत. Rajasthan Assembly Elections Results 2018: राजस्थान - काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण? सचिन पायलट यांनी दिले उत्तर
मध्य प्रदेश -
मध्य प्रदेशामध्ये 230 विधानसभा जागांवर मतदान झाले आहे. या राज्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर आहे. जनतेचा कौल कोणाच्याही बाजूला झुकू शकतो. मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान बुधनी या मतदार संघात आघाडीवर आहेत.
भारतामध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक निकालाचे अंतिम निकाल हाती येण्यास अजूनही काही कालावधी आहे.