Devendra Fadnavis On MVA: भ्रष्टाचारानं बरबटलेलं सरकार; सरकारनं लोकशाही बंद केली, फक्त 'रोकशाही' सुरु असल्याचा आरोप - देवेंद्र फडणवीस
"कधी नवे ते चहापाण्याचे निमंत्रण आले आहे. पण जे कुणाचेच ऐकत नाही, त्यांच्या निमंत्रणावर आम्ही सर्वांनी मिळून बहिष्कार घालत आहोत", असं फडणवींस म्हणाले.
मुंबई: राज्यातील हिवाळी अधिवेशन (Winter Assembly session 2021) उद्यापासुन सुरु होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील बरेच मुद्दे बघता हे आधिवेशन चांगलच गाजणार यात काही शंका नाही. अघाडी सरकारच्या राज्यातील कामावरुन विरोधकांनी मंगळवारपासुन सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवींस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी पत्रकार परिषद (Press Conferance) घेवुन महाविकास आघाडी सराकारवर (MVA) जोरदार टीका केली आहे. तेसच या सरकारनं लोकशाही बंद केली, फक्त 'रोकशाही' आणि 'रोखशाही' सुरु असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अशातच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. "कधी नवे ते चहापाण्याचे निमंत्रण आले आहे. पण जे कुणाचेच ऐकत नाही, त्यांच्या निमंत्रणावर आम्ही सर्वांनी मिळून बहिष्कार घालत आहोत", असं फडणवींस म्हणाले.
Tweet
फडणवीसांनी राज्य सरकारवर घणाघात केला आहे. फडणवीस म्हणतात, राज्यातील हिवाळी अधिवेशन उद्यापासुन सुरु होत आहे. या सरकराचा असा डाव आहे की जितकी लहानात लहान अधिवेशनं घेता येतील, जेवढ्या जास्तीत जास्त चर्चा टाळता येतील आणि जेवढी लोकशाही कुलुपबंद करता येईल, तेवढी करण्याचा प्रयत्न या छोट्याशा अधिवेशनातून केला जाणार आहे. (हे ही वाचा Local Body Elections 2021: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आज मतदान; जनमत महाविकासआघाडी की भाजपच्या बाजूने? याबाबत उत्सुकता.)
भ्रष्टाचारानं बरबटलेलं सरकार - देवेंद्र फडणवीस
भ्रष्टाचारानं बरबटलेलं हे सरकार आहे. विरोधकांनी बोलु नये यासाठी विरोधकांच तोंड बंद कऱण्यासाठी एक-एक वर्ष आमदारांना निलंबित करणे असे काळिमा फासणारे काम राज्य सरकारने केले आहे. ज्या घटना घडल्या नाहीत. त्या घटनांची कारणे सांगून आमच्या आमदारांना निलंबित केले आहे. आणि वर्षभरासाठी निलंबित करण्याचे एवढेच कारण आहे. राज्य सरकार कधीही अडचणीत येऊ शकते असे त्यांना वाटत आहे. म्हणून आमची संख्या कमी करण्यासाठी १२ आमदार निलंबित केले आहेत.
ओबीसी आरक्षणावर बोलताना फडणवीस म्हणाले राज्य सरकारला दोन वर्षांत इम्पिरीकल डेटा का गोळा करता आला नाही? असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारनेच ओबीसींचं आरक्षण घालवल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सरकारला राज्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. दोन वर्षे झाली तरीही सरकार अस्तित्वात आहे की नाही हेच कळत नाही. आता एक ठीक आहे की मुख्यमंत्र्यांची तब्बेत बरी नाही. त्यांना उत्तम आरोग्य लाभो या सदिच्छा मी व्यक्त करतो. मात्र मागच्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात सरकारचं असित्त्वच दिसत नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांप्रति हे सरकार असंवेदनशील आहे. कोणती मदत नाही, पीक विमा कंपनीच्या घशात घातला. महाराष्ट्र हे एकमेव राज्य जे पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करीत नाही, आणि दारूचे दर कमी करते असेही फडणवीस म्हणाले.