Jitendra Awhad On Raj Thackeray: जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंवर जहरी टीका, सरडा पण रंग बदलत नाही, की जितक्या गतीने राज ठाकरे रंग बदलतात
त्यांच्या भाषणाला इतक्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
गुडीपाडव्याच्या मेळाव्यातून मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जातीवाद केल्याचा गंभीर आरोप करत टीकास्त्र सोडले होते. सरकार स्थापन झाल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महाराष्ट्रात जातीय द्वेष पसरवत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. मनसे प्रमुखांनी विचारले की, "आज राज्यात लोक जातीच्या मुद्द्यावरून भांडत आहेत. आपण यातून बाहेर पडून हिंदू कधी होणार?" मुंबईत आमदारांना घरे देण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेवरही राज ठाकरे यांनी नुकतीच टीका केली होती. यावर आज जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या शैलीत राज ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले.
ठाकरें दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात
'मला आश्चर्य वाटतं जो माणूस एका प्रगतशील विचारांचा वाटायचा की, माझ्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, महाराष्ट्राला कसं पुढे घेऊन जायचं हे सांगणारे राज ठाकरे आज मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात हे प्रगती आहे का? अधोगती आहे कळत नाही? मुंब्य्राचं नाव का घेतलं मला समजलं नाही, माझं त्यांना जाहीर आवाहन आहे, या सकाळी लवकर उठून मुंब्य्राच्या एका मदरसाच्या घरात, दाढीचा वस्तरा सापडला तर मी राजकारण सोडेन, असा आव्हानच आव्हाडांनी राज ठाकरेंना दिलं. (हे देखील वाचा: शरद पवार यांचे राज ठाकरे यांना सडेतोड प्रत्युत्तर; 'चार-पाच महिने गायब असतात मग अचानक व्याख्यान देतात')
Tweet
राज ठाकरे हे महाराष्ट्रातील असे एकच नेते आहेत की जे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात, यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही, की जितक्या गतीने राज ठाकरे रंग बदलतात. त्यांच्या भाषणाला इतक्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही लोक सुट्टी असली की एखादा छान बोलणार वक्ता असला की जातात भाषणाला.
सुप्रिया सुळे यांनीही दिले जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांच्यावर बोललल्या शिवाय हेडलाईन होत नाही. त्यामुळे ते शरद पवार यांच्यावर बोलत असतात. त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासाठी मुद्देच राहिले नाहीत. पाठीमागच्या दोन-अडीच वर्षांमध्ये महाविकासआघाडीने विकासाचे अनेक मुद्दे पूर्ण केलेत. त्यामुळे विकासावर बोलण्यासाठी त्यांच्यावर काहीच नाही. त्यामुळे आता ते अशा प्रकारची टीका करताना दिसत असल्याचे सुप्रिया यांनी म्हटले आहे.